
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे मागील काही आठवड्यापासून सुसाट तेजीत धावत आहेत. सुझलॉन एनर्जी स्टॉक सध्या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.41 टक्के वाढीसह 45.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 6.96 रुपये होती. सुझलॉन एनर्जी स्टॉक आपल्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 553 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.52 टक्के वाढीसह 44.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची सपोर्ट लेव्हल 40 रुपये आहे आणि ब्रेकआउट लेव्हल 47 रुपये आहे. जर पुढील काही दिवसात सुझलॉन एनर्जी स्टॉक 47 रुपये किमतीच्या पार गेला तर, शेअरची किंमत 50 रुपयेच्या पार जाऊ शकते. तज्ञांच्या मते, चालू महिन्यात सुझलॉन एनर्जी स्टॉक 36 रुपये ते 55 रुपये दरम्यान ट्रेड करेल. Tips to Trades फर्मच्या मते सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 47.8 रुपये किमतीवर ब्रेकआउट देऊ शकतात.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या गुंतवणूकदारांनी सध्याच्या किंमत पातळीवर प्रॉफिट बुक केला पाहिजे. ज्या गुंतवणूकदारांना सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करायचा आहे, त्यांनी गुंतवणूकदारांना किमान 38 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावावा असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे एकूण 13.29 टक्के भाग भांडवल होते. डिसेंबर 2023 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या निव्वळ नफ्यात 45 टक्के वाढ नोंदवली आहे.
डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 102 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 1417 रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी यांच तिमाही कालावधीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 1430 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.