 
						Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळत आहे. विकास लाइफकेअर कंपनीने 108 कोटी रुपये गुंतवणुक करून स्मार्ट मीटर उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी एक संयुक्त उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे.
विकास लाइफकेअर कंपनीने माहिती दिली की, त्यांची उपकंपनी असलेल्या जेनेसिस गॅस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीसोबत 49:51 या प्रमाणात संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
या संयुक्त उपक्रमाचे नाव IGL जेनेसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड असे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विकास लाइफकेअर स्टॉक तेजीत आला आहे. आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी विकास लाइफकेअर स्टॉक 9.30 टक्के वाढीसह 7.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
विकास लाइफकेअर कंपनी आपला हा संयुक्त उपक्रम उत्तर प्रदेश राज्यातील नोएडा याठिकाणी 108 कोटी रुपये गुंतवणूक करून सुरू करणार आहे. या उपक्रमात कंपनी स्मार्ट मीटर उत्पादन करणार आहे. या युनिटची वार्षिक उत्पादन क्षमता 1 दशलक्ष स्मार्ट मीटर असेल. हा युनिट 65,000 चौरस फूट क्षेत्रावर विस्तारलेला असेल. आणि यावर्षी जुलै 2024 पर्यंत हा युनिट सुरू होण्याची शक्यता आहे. विकास लाइफकेअर ही कंपनी मुख्यतः पॅलेट्स आणि इंटरलॉकिंग टाइल्स निर्मितीमध्ये प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करणारी कंपनी आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह 6.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या स्टॉकमध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. 9 जानेवारी 2024 रोजी विकास लाइफकेअर स्टॉक 7.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. नुकताच मॉरिशसस्थित एजी डायनॅमिक्स फंड्स लिमिटेड कंपनीने विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीमध्ये QIP च्या माध्यमातुन गुंतवणूक केली आहे.
विकास लाइफकेअर कंपनीने या पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना 4.80 रुपये किमतीवर 10,41,65,000 इक्विटी शेअर्स जारी केले आहे. या स्टॉक इश्यूची फ्लोअर किंमत 5.02 रुपये होती. विकास लाइफकेअर कंपनीने विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक श्रेणीमध्ये तीन दिग्गज गुंतवणूकदारांना देखील इक्विटी शेअर्स इश्यू केले आहे. यामधे एजी डायनॅमिक्स फंड, नक्षत्र स्ट्रेस्ड अॅसेट फंड आणि आस ग्लोबल अपॉर्चुनिटीज यासारख्या संस्था आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		