 
						Cantabil Share Price | कँटाबिल रिटेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षात कँटाबिल रिटेल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7300 टक्के परतावा कमवून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी कँटाबिल रिटेल कंपनीच्या स्टॉकवर 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी कँटाबिल रिटेल कंपनीचे शेअर्स 3.44 टक्के वाढीसह 266.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 5 वर्षात कँटाबिल रिटेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 909 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 9 लाख रुपये झाले असते.
मात्र मागील एका वर्षापासून कँटाबिल रिटेल स्टॉक प्रॉफिट बुकींगला बळी पडला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 टक्के वाढली आहे. तर मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कँटाबिल रिटेल स्टॉक 257.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
कँटाबिल रिटेल या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 74.97 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 25.03 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्म BofA ने कँटाबिल रिटेल कंपनीचे 2.12 टक्के शेअर्स खरेदी केले होते.
या कंपनीच्या कर्मचारी वर्गात 3700 पेक्षा जास्त लोक आहेत. या कंपनीचे 500 विशेष रिटेल आउटलेट सध्या कार्यरत आहेत. कँटाबिल रिटेल ही कंपनी पुरुष आणि महिलांसाठी ट्रेडिशनल आणि पार्टी वियर बनवते. सप्टेंबर 2023 तिमाहीत कँटाबिल रिटेल कंपनीने एकूण 135 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्यात या कंपनीचा नफा 7.5 कोटी रुपये होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		