29 April 2024 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा
x

Multibagger Stocks | या शेअरने 1100 टक्के परतावा दिला, आता प्रति शेअर 10 बोनस शेअर्स मिळणार, तुमच्या पोर्टफोलिओत आहे स्टॉक?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजाराबाबत असे म्हटले जाते की, जर तुम्ही योग्य स्टॉक निवडून त्यात गुंतवणूक केली तर दीर्घकाळासाठी स्टॉक होल्ड करा. कारण चांगला परतावा दीर्घकाळातच कमावत येतो. सर्वकाही शेअरच्या कामगिरीवर अवलंबून असते. आज आपण या लेखात अश्याच एका शेअरबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. त्या कंपनीचे नाव आहे, “निखिल अॅडेसिव्ह्स लिमिटेड”. ही अशा काही कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांनी मागील काही वर्षांत उत्कृष्ट कामगिरी गेली आहे, आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. नुकताच या कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली असून, कंपनी लवकरच आपले शेअर्स विभाजित करणार आहे. कंपनीच्या वतीने SEBI नियामकला दिलेल्या माहितीत असे म्हंटले आहे की, कंपनीने आपले स्टॉक स्प्लिट करण्याचे ठरवले आहे, आणि त्यासाठी रेकॉर्ड तारीख 13 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.

शेअर्सचे विभाजन प्रमाण :
BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या Nikhil Adhesives Ltd कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. कंपनीने आता हे शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिट प्रमाणानुसार 10 रुपये दर्शनी मूल्य असलेला शेअर 10 शेअर्स मध्ये विभागला जाईल. याचे प्रमाण 10:1 असेल. या स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल. कंपनीच्या वतीने SEBI ला दिलेल्या माहितीत स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख 13 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.

कंपनीच्या शेअरची कामगिरी :
निखिल अॅडेसिव्ह लिमिटेड च्या शेअर ने मागील काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. गुंतवणूकदारांनी ह्या स्टॉकमधून जबरदस्त नफा कमावला आहे. चालू वर्ष 2022 मध्ये या कंपनीचा शेअर 790 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक सध्या 1676 रुपये वर ट्रेड करत आहे. म्हणजेच या वर्षभरातच शेअर्समध्ये 110 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहेत. एक वर्षापूर्वी जर तुम्ही या शेअर मध्ये पैसे गुंतवले असते तर सध्या तुम्हाला 140 टक्के नफा झाला असता.

मागील 5 वर्षांतील चार्ट पॅटर्नच्या आकडेवारीचे निरीक्षण केले तर असे कळते की कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 1100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी 10 वर्षांपूर्वी जर तुम्ही या शेअर मध्ये गुंतवणूक केली असती तर आतापर्यंत तुमची गुंतवणूक 50 पट अधिक वाढली असती. मागील 20 ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीच्या शेअरच्या किमती सुमारे 50 टक्क्यांनी वर गेल्या आहेत. BSE निर्देशांकावर कंपनीच्या शेअर ची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1847.95 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 603.60 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Nikhil Adhesive Ltd Share price return on investment on 03 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x