13 May 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस! स्टॉक प्राईस सुद्धा स्वस्त, खरेदीला ऑनलाईन गर्दी Kuber Yog 2024 | कुबेर योग 'या' 4 राशींच्या लोकांसांठी भाग्यशाली, यामध्ये तुमची नशीबवान राशी आहे का? Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये हायर टॉप आणि हायर बॉटम पॅटर्न, पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. मात्र हा शेअर अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून देऊ शकतो. तज्ञांच्या मते टाटा पॉवर स्टॉक ब्रेकआउट देण्यात यशस्वी ठरला असून रिस्क रिवॉर्डच्या दृष्टिकोनातून सध्याच्या किमतीवर गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक आकर्षक वाटत आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 353 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक लाल निशाणीसह ट्रेड करत आहे. आज बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.91 टक्के घसरणीसह 350.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सध्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 350 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. मात्र तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काही दिवसात 375 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणून तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉक 358 रुपये ते 359 रुपयेची पातळी ओलांडल्यास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉकवर 375 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आणि गुंतवणूक करताना नुकसान टाळण्यासाठी 348 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

टाटा पॉवर स्टॉकमध्ये हायर टॉप आणि हायर बॉटम असे पॅटर्न पाहायला मिळत आहे. यावरून शेअरमध्ये तेजीचे संकेत मिळत आहे. टाटा पॉवर शेअरने नुकताच एक ब्रेकआऊट दिला आहे, त्यामुळे स्टॉक व्हॉल्यूम चांगली वाढली आहे. या परिस्थितीत टाटा पॉवर स्टॉकमध्ये अधिक चढ-उतार होण्याची शक्यता वाढते. शेअरमध्ये होणारी घसरण ही गुंतवणुक करण्याची एक सुवर्ण संधी असेल.

मागील एका महिन्यात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37 टक्के नफा कमावून दिला आहे. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 361.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 182 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 17 January 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x