
Multibagger Stocks| आयटी कंपनी सुबेक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. बीएसईवर या कंपनीचा शेअर गुरुवारी सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशन मध्ये 18 टक्केच्या वाढीसह 39 रुपयांच्या पातळीवर गेला होता.
मुकेश अंबानी यांच्या कंपनीसोबत व्यापारी करार :
मुकेश अंबानी यांच्या कंपनीसोबत व्यापारी कराराची बातमी येताच आयटी कंपनी सुबेक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी उसळी पाहायला मिळाली. या कंपनीच्या शेअरमध्ये एका दिवसात तब्बल 18 टक्के वाढ झाली आणि शेअर 39 रुपयांवर जाऊन पोहोचला. जिओ प्लॅटफॉर्मसोबत भागीदारीची घोषणा झाल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, कंपनीचे शेअर्स 20% च्या अप्पर सर्किटसह लॉक झाले होते. मागील दोन दिवसांत सुबेक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये 45 टक्के ची उसळी पाहायला मिळाली आहे.
मंगळवारी कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीत सांगितले की, 5G सेवासाठी जिओ प्लॅटफॉर्म आणि सुबेक्स यांच्यात महत्त्वपूर्ण भागीदारी झाली आहे. या करारानुसार, जिओ प्लॅटफॉर्म क्लोज लूप नेटवर्क ऑटोमेशन, उत्पादन कार्यप्रदर्शन आणि ग्राहक अनुभव विश्लेषणे सक्षम करण्यासाठी सुबेक्सच्या हायपरसेन्सच्या सहकार्याने जागतिक स्तरावर टेलकोसला त्याचा क्लाउड नेटिव्ह 5G कोर ऑफर करेल. या कराराची बातमी आल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे.
सुबेक्स लिमिटेड ही बंगलोर स्थित आयटी कंपनी आहे. ही IT कंपनी आपल्या ग्राहकांना सेवा प्रदात्यांना टेलिकॉम अॅनालिटिक्स सोल्यूशन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित सेवा पुरवते. कंपनीच्या कामगिरीचे निरीक्षण केले तर या वर्षात आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये 26% ची घसरण झाली होती असे दिसेल. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स एका वर्षात 31% घसरले होते. पण आता शेअर्सनी जबरदस्त उसळी घेतली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.