
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत आयआरईडीए कंपनीच्या निव्वळ नफ्यात 77 टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 355.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 200.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
या तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 1,253.19 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील मागील आर्थिक वर्षाच्या तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 868.97 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 9.97 टक्के वाढीसह 148.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
डिसेंबर 2023 तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 867.05 कोटी रुपये खर्च केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 634.27 कोटी रुपये खर्च केला होता. शनिवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स मागील दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमधील 135.40 रुपये या क्लोजींग किमतीच्या तुलनेत 10 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आयआरईडीए कंपनीचा आयपीओ नोव्हेंबर 2023 रोजी शेअर्स बाजारात लाँच करण्यात आला होता.
आयआरईडीए कंपनीचा IPO 29 नोव्हेंबर 2023 रोजी 60 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. या कंपनीने IPO मध्ये शेअर्सची इश्यू किंमत 32 रुपये निश्चित केली होती. या किमतीच्या तुलनेत शेअर 87.5 टक्के प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाले होत. IPO च्या इशु किंमतीच्या तुलनेत आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 300 टक्के वाढले आहेत.
आयआरईडीए ही कंपनी मुख्यतः भारतीय नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक बिगर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता संवर्धनाच्या नवीन आणि नूतनीकरणीय स्त्रोतांशी संबंधित प्रकल्पांची स्थापना, विकास आणि विस्तार करण्यासाठी वित्तीय सहाय्य प्रदान करण्याचा व्यवसाय करते. डिसेंबर 2023 तिमाहीत आयआरईडीए कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 75 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 25 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते आयआरईडीए कंपनीचे शेअर्स काही आठवड्यात 172 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांनी आयआरईडीए आयपीओ लिस्टिंगनंतर स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.
तज्ञांनी या स्टॉक मध्ये गुंतवणूक करताना 125 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते आयआरईडीए कंपनीचे शेअर्स पुढील काळात 156 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस स्पर्श करतील आणि नंतर हा स्टॉक 172 रुपये किमतीवर जाईल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.