
Benares Hotels Share Price | बेनारस हॉटेल्स लिमिटेड कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 37 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. आणि कंपनीने हा तिमाहीत महसुल संकलनात जवळपास 21 टक्क्यांची नोंदवली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बेनारस हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दिवसाअखेर बेनारस हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 5.29 टक्क्यांच्या वाढीसह 9,809.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
बेनारस हॉटेल्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,264.90 कोटी रुपये आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने 9,965.00 रुपये उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी बेनारस हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 0.098 टक्के घसरणीसह 9,800 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बेनारस हॉटेल्स कंपनीचा महसूल तिमाही-दर-तिमाही आधारावर 30 टक्क्यांनी वाढला होता. तर तिसऱ्या तिमाहीत या कंपनीचा महसूल संकलन 26 कोटी रुपयेवरून वाढून 34 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मधील तिसऱ्या तिमाहीत बेनारस हॉटेल्स कंपनीने 34 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 28 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जो या तिमाहीत 21 टक्क्यांनी वाढला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बेनारस हॉटेल्स कंपनीने 7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर डिसेंबर तिमाहीत बेनारस हॉटेल्स कंपनीने 11 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत बेनारस हॉटेल्स कंपनीचा निव्वळ नफा तिमाही-दर-तिमाही आधारावर 57 टक्क्यांनी वाढला आहे. याशिवाय कंपनीचा निव्वळ मागील वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 37 टक्क्यांनी वाढला आहे.
मागील सहा महिन्यांत बेनारस हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 89.59 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 229.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.29 लाख रुपये झाले असते.
चालू आर्थिक वर्षात बेनारस हॉटेल्स कंपनीचा इक्विटी ऑन रिटर्न 26.3 टक्के आणि एम्प्लॉयड कॅपिटल रिटर्न 34.2 टक्के नोंदवला आहे. तर कंपनीचा रिटर्न रेशो 26.3 टक्के नोंदवला गेला आहे. बेनारस हॉटेल्स कंपनीच्या प्रवर्तकानी कंपनीचे 62.57 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 37.43 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
बेनारस हॉटेल्स कंपनी भारतात हॉटेल व्यवसाय चालवते. ही कंपनी मुख्यतः हॉस्पिटॅलिटी आणि फूड इंडस्ट्री सेक्टरमध्ये व्यवसाय करते. या कंपनीच्या हॉटेल्स गृपमध्ये वाराणसीमधील ताज गंगा आणि नादेसर पॅलेस तसेच महाराष्ट्रातील गोंदियामधील जिंजर हॉटेल सामील आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.