1 May 2024 1:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

 PPF e-Passbook | पीपीएफ गुंतवणूकदारांना ई-पासबुक मार्फत आता कोणत्याही अल्प बचत खात्याची माहिती घर बसल्या मिळणार

PPF e-Passbook

PPF e-Passbook | बॅंका, पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये अनेक व्यक्ती पैशांची गुंतवणूक करतात. यात गुंतवूक करताना अनेक जण याचा लेखी हिशोब देखील ठेवतात. अशात आता तुम्ही केणत्याही योजनेत गुंतवलेल्या पैशांचे सर्व अपडेट तुम्हाला कधीही आणि कोठेही मिळवता येणार आहेत. डाक विभागाने १२ ऑक्टोबर २०२२ रोजी दिलेल्या माहिती नुसार सक्षम प्राधिकारी विभागाने ई-पासबुकची सुविधा सुरू केली आहे. यात तुम्ही तुमच्या कोणत्याही छोट्या योजनेचा लाभ मिळवू शकता. १२ ऑक्टोबर २०२२ पासून ही सेवा सर्व ग्राहकांना पुरवण्याच्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त तुमच्या खात्याला लिंक असलेला मोबाइल क्रमांक असायला हवा. तसेच ही सेवा सर्व खातेदारकांना मोफत आहे. यासाठी कोणतेही अतीरिक्त शुल्क आकारण्याची गरज नाही.

या सुविधेचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही लघु बचत खाते असलेल्या ग्राहकाला नेट बॅंकींग आणि मोबाइल बॅंकींगच्या ऍक्सेसची आवश्यकता नाही. तुमच्या खात्यात जमा झालेल्या पैशांची माहिती कधीही आणि कोठेही उपलब्ध होऊ शकते. ही सेवा विनाशुल्क आहे. त्यामुळे लघु बचत खातेधारकांना या ई-पासबुकचा जास्त फायदा होईल.

ई-पासबुक पुरवते या सेवा
* बॅंलेन्सची माहिती या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या राष्ट्रीय योजना खात्यातील सर्व माहिती मिळवू शकता.
* ही सुविधा सुरूवातीला तुम्हाला पीओ बचत खाते, सुकन्या समृध्दी खाते आणि पब्लीक प्रोविडेंट फंड साठी याचा फायदा होईल.
* त्यानंतर हळूहळू इतर खात्यांसाठी ही सेवा तुम्ही उपयोगात आणू शकाल.
* तुमचे १० ट्रांजेक्शन यावर दिसतील. जे पीडीएफ स्वरूपात तुम्ही डाउनलोड करू शकाल.
* संपूर्ण माहिती ही काही काळाणे तुम्हाला पाहता येईल.

पीपीएफ सुकन्या समृध्दी खात्याची माहिती अशी जाणून घ्या
* आधी www.indiapost.gov.in किंवा www.ippbonline.com वर जाउन ई-पासबुक लिंकवर क्लिक करा.
* नंतर मोबाइल क्रमांक, कॅप्चा, लॉगइन, ओटीपी, सबमिट या सर्व गोष्टी करा.
* पुढे ई-पासबुक निवडा
* तुमची योजना कोणत्या प्रकारची आहे तो प्रकार निवडा.
* तुमचा खाते क्रमांक टाका आणि मोबाइल नंबर, कॅप्चा, ओटीपी सर्व गोष्टी भरा.
* नंतर बॅलेन्स इन्कायरी, मिनी स्टेटमेंट, संपूर्ण विवरण या पैकी एक पर्याय निवडून माहिती मिळवा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PPF e-Passbook get information about any Small Savings Account now through e-passbook at home 21 October 2022.

हॅशटॅग्स

PPF e-Passbook(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x