18 May 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या
x

Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! 480 टक्के परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 133.32 टक्के वाढीसह 7,100 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये टाटा मोटर्स कंपनीने 3,043 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 25 टक्के वाढीसह 1,10,600 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.49 टक्के वाढीसह 882.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

टाटा मोटर्स कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली की, “टाटा मोटर्स कंपनी आपल्या वाहन व्यवसायांमध्ये सकारात्मक कामगिरी करत आहे. नवीन वाहन लाँच करण्यामुळे आणि JLR मधील कामगिरीत सुधारणा झाल्यामुळे कंपनीच्या मार्च 2023 तिमाहीत देखील कामगिरी सुधारण्याची अपेक्षा आहे”.

टाटा मोटर्स समूहाने आपल्या निवेदनात माहिती दिली की, “टाटा समूहाचे व्यवसाय आपल्या निर्धारित धोरणांवर मजबूत कामगिरी करत आहे. आणि या तिमाहीमध्ये टाटा समुहातील अनेक कंपन्यांनी सकारात्मक आर्थिक निकाल जाहीर केले आहे. टाटा समूहाने चालू आर्थिक वर्षाची समाप्ती मजबूत स्थितीत करण्याचे आणि आगामी तिमाहीत कामगिरीतील सुधारणांवर अधिक जोर देण्याचे ध्येय निश्चित केले आहे”.

मागील एका महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 13 टक्के वाढली आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 11 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के वाढवले आहे.

मागील पाच वर्षांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 480 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 901.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 400.40 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,92,011.80 कोटी रुपये आहे. ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 925 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 03 February 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x