14 December 2024 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये पुन्हा हालचाल वाढली, तज्ज्ञांचा शेअरबाबत काय अंदाज? स्टॉक खरेदी करावा की विकावा?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 20.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. म्हणजेच अवघ्या दोन दिवसांत सुझलॉन एनर्जी स्टॉक 10 टक्के वाढला होता. स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे, सुझलॉन एनर्जी कंपनीने भडणवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Suzlon Energy Share Price)

सुझलॉन एनर्जी कंपनीने 9 ऑगस्ट 2023 दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाने क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट द्वारे 2,000 कोटी रुपये भांडवल जमा करण्याची हालचाल सुरू केली आहे. आज शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के घसरणीसह 20.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीने, भांडवल उभारणी करण्यासाठी 2,000 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स ऑफर केले होते. यासाठी गुंतवणूकदारांकडून तब्बल 4,600 कोटी रुपये मूल्याची मागणी प्राप्त झाली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने 7 जुलै 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत भांडवल उभारणीचा प्रस्ताव मंजुर केला होता. तर 8 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीने भागधारकांकडून पोस्टल बॅलेटद्वारे विशेष ठरावावर मत मागवले होते.

कंपनीने पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स जारी करून ही भांडवल उभारणी केली आहे. कंपनीने आपल्या पात्र संस्थात्मक खरेदीदारांना स्टॉक जारी करण्यातही शेअरची प्रति इक्विटी शेअर किमान किंमत 18.44 रुपये निश्चित केली आहे. आणि कंपनीने गुंतवणूकदारांच्या फ्लोअर प्राईसवर 5 टक्क्यांची सूट देण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे.

मागील काही दिवसापासून सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. YTD आधारे सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 90.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 123.30 टक्के परतावा कमावून दिला आहे.

एकेकाळी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 349 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 20.80 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 6.60 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 25,452.10 कोटी रुपये आहे.

Tips 2 Trades फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स दैनंदिन चार्टवर 19.4 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार निर्माण करत आहेत. तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी तत्काळ स्टॉक विकून प्रॉफिट बुक करावा. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक 17.7 रुपये किंमत तोडून खाली येऊ शकतो. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकने 8 रुपये किमतीवरून मजबूत तेजी पकडली होती. आणि शेअरची किंमत 20.80 रुपये किमतीवर पोहचली होती. काही तज्ज्ञांच्या मते पुढील काळात हा स्टॉक 34 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Suzlon Share Price today on 11 August 2023

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(270)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x