18 May 2024 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअरमध्ये बंपर तेजी, 2 दिवसात दिला 27% परतावा, पॉवर सेक्टर मालामाल करणार

SJVN Share Price

SJVN Share Price | 1 फेब्रुवारी रोजी भारत सरकारने अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला, आणि ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू झाली. याच कंपन्याच्या शेअर्समध्ये एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स देखील सामील होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 146.30 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते.

मार्च 2023 मध्ये एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 30.39 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 12.07 टक्के वाढीसह 142.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

अंतरिम अर्थसंकल्पात ऊर्जा निर्मिती क्षेत्रासाठी भारत सरकारने 93200 कोटी निधीची तरतूद केली आहे. मागील वर्षी पॉवर सेक्टरला जारी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीच्या तुलनेत या अर्थसंकल्पात 17 टक्के वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी भारत सरकारने पॉवर सेक्टरसाठी 79616 कोटी रुपये निधीची तरतूद केली होती.

मागील वर्षी एनएचपीसी कंपनीला 9006 रुपये निधी वाटप करण्यात आला होता, जो आता 11761 कोटी रुपये करण्यात आला आहे. पॉवर ग्रीड कंपनीला भारत सरकरने 8800 कोटी रुपये निधी वाटप केला होता, जो आता 12250 कोटी रुपये करण्यात आला आहे. एसजेव्हीएन कंपनीला गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात 10000 कोटी रुपये निधी देण्यात आला होता, जो या वर्षी 12000 कोटी रुपये करण्यात आला आहे.

डिसेंबर 2023 पर्यंत एसजेव्हीएन कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 81.85 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या सरकारी कंपनीमध्ये भारताचे राष्ट्रपती देखील प्रवर्तक म्हणून सामील आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी एसजेव्हीएन कंपनीचे 2,16,13,45,449 शेअर्स म्हणजेच जवळपास कंपनीचे 55 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. कंपनीचे 18.15 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणुकदारांनी धारण केले आहे.

एसजेव्हीएन कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 9 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले जातील. यासह अंतरिम लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर केला जाऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 03 February 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x