18 May 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

Adani Port Share Price | 1 महिन्यांत 67% परतावा देणारा शेअर अदानी पोर्ट्स शेअर तेजीत, पुढेही पैसा वेगात वाढेल

Adani Port Share Price

Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1279.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डिसेंबर तिमाहीमध्ये अदानी पोर्ट्स कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. Adani Ports Share Price

या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात तब्बल 65 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीने डिसेंबर तिमाहीचे आणि मागील 9 महिन्यांच्या आर्थिक कामगिरीचे विवरण जाहीर केले आहेत. शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 3.58 टक्के वाढीसह 1,262.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 तिमाहीत अदानी पोर्ट्स कंपनीने 2208 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 65 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत अदानी पोर्ट्स कंपनीने 4245 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या पहिल्या नऊ महिन्यात 43 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

ब्रोकरेज फर्म एचएसबीसीने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1370 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणून तज्ञांनी या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. डिसेंबर 2013 तिमाहीत अदानी पोर्ट्स कंपनीने 6920.10 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 4786.17 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

वार्षिक आधारावर कंपनीच्या महसूल संकलनात 44.58 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. अदानी पोर्ट्स कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 59 टक्क्यांनी वाढला आहे. डिसेंबर तिमाहीत अदानी पोर्ट्स कंपनीने सर्वाधिक मालाची आवक झाल्याची माहिती दिली आहे. हे प्रमाण देशांतर्गत मालवाहू मालाच्या 2.5 पट अधिक आहे. रेल्वेचे प्रमाण 1,57,904 TEUs होते.

मागील महिन्यांत अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 67 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1287 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 394.95 रुपये होती. अदानी पोर्ट्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,74,456 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Port Share Price NSE Live 03 February 2024.

हॅशटॅग्स

Adani Port Share Price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x