13 December 2024 7:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Servotech Share Price | शेअरची किंमत 99 रुपये! अल्पावधीत पैसा वाढवणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Servotech Share Price

Servotech Share Price | सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 99.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स या इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपनीचे शेअर्स 99.85 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. Servotech Power Share Price

या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक तेजी येण्याचे कारण म्हणजे, अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टमचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 99.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टमच्या माध्यमातून भारत सरकार सार्वजनिक वाहतूक नेटवर्कसाठी ई-बसेसला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टमबाबत नवीन बजेट प्रस्तावांमध्ये तरतूद असल्याने सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहे. सर्व्होटिक पॉवर सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी इलेक्ट्रॉनिक व्हेहिकल क्षेत्रात व्यवसाय करते.

सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीने 6 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनी आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. प्रभुदास लिलाधर फर्मने सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या तिमाही कामगिरीबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअर्समध्ये 88 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स एकदा 100 रुपयेच्या पार गेले की हा स्टॉक 112 रुपये किमतीवर जाऊ शकतो. त्यामुळे तज्ञांनी गुंतवणुकदारांना स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी 88 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

मागील आठवड्यात सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनीने मोठी ऑर्डर दिली आहे. BPCL कंपनीने सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीला 1800 DC फास्ट ईव्ही चार्जर उभारण्यासाठी 120 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीला उत्पादन, पुरवठा आणि स्थापना यासारखे सेवा प्रदान करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Servotech Share Price NSE Live 03 February 2024.

हॅशटॅग्स

Servotech Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x