Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली, किती परतावा मिळेल?
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत व्यवहार करत होते. टाटा मोटर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह 731 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डिसेंबर 2023 या महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 6.83 टक्के नफा कमावून दिला आहे.
ब्रोकरेज फर्म शेअरखानने टाटा मोटर्स स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 840 रुपये निश्चित केली आहे. नोव्हेंबर 2023 तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉकची टारगेट प्राइस 787 रुपये निश्चित केली होती. ज्यात आता वाढ करण्यात आली आहे. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.23 टक्के घसरणीसह 723 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच टाटा मोटर्स कंपनीला हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या बसेसची निर्मिती करण्याची परवानगी केंद्रीय मोटर वाहन मंत्रालयाने जारी केली आहे. टाटा मोटर्स कंपनीने वाहन बाजारात आपला इलेक्ट्रिक वाहन विभाग स्थिर केला आहे.
आता टाटा मोटर्स कंपनीने आपले संपूर्ण लक्ष हायड्रोजन इंधन तंत्रज्ञानावर केंद्रित केले असल्याची माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या उत्तरार्धात JLR कंपनीच्या कामगिरीमध्ये देखील सुधारणा पाहायला मिळू शकते. टाटा मोटर्स कंपनीच्या व्यावसायिक आणि प्रवासी वाहनांच्या मागणीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.
टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 734.75 रुपये होती. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकची किंमत 11 टक्के वाढली आहे. तर मागील सहा महिन्यांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27.75 टक्के नफा कमवून दिला आहे. 203 या वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 84.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी याच महिन्यात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 394 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 727 रुपये किमतीवर पोहचला आहे.
नुकताच टाटा मोटर्स कंपनीने एचडीएफसी बँकेशी करार केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला टाटा मोटर्सने आपले व्यावसायिक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिजिटल फायनान्स सोल्यूशन्स सेवा प्रदान करण्यासाठी HDFC बँकेसह करार केला आहे. या भागीदारी अंतर्गत, HDFC बँक टाटा मोटर्स कंपनीच्या सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहनांसाठी वित्त सोल्यूशन्स सेवा प्रदान करण्याचे काम करणार आहे.
ही सेवा ग्राहकांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून जाईल, जेणेकरून ग्राहकांना सहज आणि लवकर कर्ज घेता येईल. या भागीदारी अंतर्गत एचडीएफसी बँक टाटा मोटर्स कंपनीच्या डीलर्सना आर्थिक सहकार्य करणार आहे. टाटा मोटर्स कंपनीचे डीलर आपल्या ग्राहकांना HDFC बँकेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे कर्जासाठी अर्ज करण्यास सहाय्य करतील.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स निर्देशांक 180.55 अंकांच्या वाढीसह 71,045.65 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 58 अंकांच्या वाढीसह 21,313.05 अंकावर ट्रेड करत होता. शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांकावर टाटा स्टील, टाटा मोटर्स, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा आणि बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स तेजीत व्यवहार करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors Share Price NSE Live 26 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC