8 May 2025 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 55% रिटर्न मिळेल, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL NHPC Share Price | तब्बल 42 टक्के परतावा मिळेल, मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, किंमत 82 रुपये - NSE: NHPC HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL
x

HUDCO Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या हुडको शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली पुढची मजबूत टार्गेट प्राईस

HUDCO Share Price

HUDCO Share Price | अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यापासुन शेअर बाजारातील तज्ञ हुडको कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. अर्थमंत्र्यांनी 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर करताना घोषणा केली की, भाड्याची घरे, झोपडपट्ट्या, चाळी किंवा अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वतःचे घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी भारत सरकार एक योजना सुरू करणार आहे. ही घोषणा करताच हुडको कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी निर्माण झाली होती.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हुडको कंपनीचे शेअर्स 207.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी हुडको कंपनीचे शेअर्स 2.98 टक्के घसरणीसह 201.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

हुडको कंपनी पुढील आर्थिक वर्षापासून खाजगी क्षेत्रातील रिअल इस्टेट कंपन्यांना वित्तपुरवठा करण्याबाबत सकारात्मक विचार करत आहे. रिअल इस्टेट क्षेत्र अजूनही कोविड महामारीच्या नुकसानीतून पूर्णपणे सावरले नाहीये. सध्या हुडको कंपनी रिअल इस्टेट आणि गृहनिर्माण क्षेत्रातील खाजगी कॉर्पोरेट्सना वित्तपुरवठा करत नाहीये. हुडको कंपनीचे व्यावसायिक उपक्रम मुख्यतः सरकारी आणि सरकारी मालकीच्या प्रकल्पांना मर्यादित अर्थ सहाय्य करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हुडको कंपनीच्या शेअर्समध्ये चढ-उतार पाहायला मिळू शकते. चॉइस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, हुडको कंपनीचे शेअर्स टेक्निकल चार्टवर सकारात्मक पाहायला मिळत आहे. या स्टॉकमध्ये 226 रुपये किमतीवर किरकोळ प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 226 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर अल्पावधीत 240 रुपये ते 250 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. ज्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये हुडको कंपनीचे शेअर्स आहेत, त्यांना 200 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

हुडको कंपनीमध्ये भारत सरकारने 54.40 भाग भांडवल धारण केले आहे. तर आयुर्विमा महामंडळाने कंपनीचे 8.9 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 11.9 टक्के शेअर्स धारण केले आहेत. तर परकीय संस्था आणि गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 9.1 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HUDCO Share Price NSE Live 05 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Hudco Share Price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या