16 May 2024 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टेक्निकल चार्ट पॅटर्ननुसार तेजीचे संकेत, प्राईस 100 रुपयांपर्यंत जाणार? तज्ज्ञांनी काय म्हटलं?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यापासुन अक्षय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. भारत सरकारने अक्षय ऊर्जा क्षेत्राचा विकास आणि विस्तार करण्यासाठी उचललेल्या पावलांचा सकारात्मक परिणाम पॉवर सेक्टरमधील कंपन्याच्या शेअर्सवर पाहायला मिळत आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 50 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 400 टक्क्यांनी वाढली आहे. आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.04 टक्के घसरणीसह 47.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारत सरकारने आपल्या अंतरिम अर्थसंकल्पात 1 GW ऑफशोअर पवन ऊर्जा क्षमतेच्या विकासासाठी मोठ्या निधीची तरतूद केली आहे. याचा फायदा सुझलॉन एनर्जी सारख्या कंपन्यांना होऊ शकतो. तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 60 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. या कंपनीचे शेअर्स टेक्निकल चार्ट पॅटर्नवर सकारात्मक वाढीचे संकेत देत आहेत. तज्ञांनी गुंतवणुकदारांना नुकसान टाळण्यासाठी सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये 45 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते सुझलॉन एनर्जी स्टॉक पुढील काळात 55 ते 60 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

कालच्या दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 50 रुपये या उच्चांक किंमत आणि 48.55 रुपये या नीचांक किंमतीच्या दरम्यान ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सची वार्षिक उच्चांक किंमत पातळी 50.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.95 रुपये होती. या कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 2 रुपये आहे.

मागील 1 आठवड्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 20.57 टक्के वाढली आहे. मागील 3 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 42.92 टक्के नफा कमावून दिला आहे.

1 जानेवारी 2024 पासून आतापर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 28.14 टक्के वाढली आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 440.88 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तब्बल 647.33 टक्के वाढवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 06 February 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x