29 April 2024 3:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल काल सुसाट तेजीत आणि आज धडाम, पेटीएम पेमेंट्स बँकबाबत अपडेट आली

Jio Financial Share Price

Jio Financial Share Price | नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट घसरण पाहायला मिळत आहे. वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स सलग तीन ट्रेडिंग सेशनपासून लोअर सर्किट हीट करत आहेत. काही तज्ञांच्या मते, पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना देखील रद्द होण्याची शक्यता बळावली आहे.

सध्या शेअर बाजारात मुकेश अंबानी पेटीएम वॉलेटचा व्यवसाय खरेदी करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 3.20 टक्के घसरणीसह 279.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, मुकेश अंबानीं यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी व्यतिरिक्त, एचडीएफसी बँक देखील पेटीएम वॉलेटच्या व्यवसाय खरेदीबाबत चर्चा करत आहे. या बातमीनंतर, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सोमवारी एका दिवसात 14 टक्के वाढीसह 289.70 रुपये किमतीवर पोहचले होते.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी मागील वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमधून डिमर्ज झाली होती. त्यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE निर्देशांकावर सूचीबद्ध झाले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेटीएम कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा नोव्हेंबर 2023 पासून जिओ फायनान्शियल कंपनीशी चर्चा करत आहेत. आता पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने कडक कारवाई केल्याने त्यांनी एचडीएफसी बँकेसोबत देखील चर्चा सुरू केली आहे. तज्ञांच्या मते, एक शक्यता अशी देखील आहे की, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी मोठा बेलआउट पॅकेज जाहीर करून पेटीएम पेमेंट्स बँक खरेदी करण्याची ऑफर देऊ शकते.

पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडने दिले स्पष्टीकरण
पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडनेही अशी कोणतीही चर्चा कोणाशीही सुरू नसल्याची माहिती दिली आहे. मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने यापूर्वी पेटीएम वॉलेट खरेदी करण्यासाठी संकटग्रस्त वन९७ कम्युनिकेशन्सशी बोलणी करत नसल्याचे सांगितले होते.

पेटीएम वॉलेट खरेदी च्या अफवांमुळे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर सोमवारी १३ टक्क्यांनी वधारून २८९ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. १.७ लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे समभाग मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात चार टक्क्यांनी घसरून ११ रुपयांनी घसरून २७८ रुपयांवर व्यवहार करत होते.

आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला ग्राहकांच्या खात्यामध्ये कोणतीही रक्कम जमा करण्यास किंवा क्रेडिट स्वीकारण्यावर बंदी घातली आहे. तज्ञांच्या मते, मनी लाँडरिंग संबंधित आरोप आणि ग्राहक KYC नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पेटीएम कंपनीचा नियामक बँकिंग परवाना आणि पेटीएम वॉलेट परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो.

आरबीआयच्या तपासणीत असे काही तथ्य आढळले आहे की, 1,000 पेक्षा जास्त ग्राहकांनी एकच PAN नंबर विविध पेटीएम खात्यांना जोडले आहे. याशिवाय ग्राहक केवायसी संबंधित नियमांचेही मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचा आरोप पेटीएम कंपनीवर करण्यात आला आहे. यातील काही खाती मनी लाँडरिंग आणि आर्थिक गैर व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात वापरली गेली आहे, असे देखील RBI ला चौकशीमध्ये आढळले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Share Price NSE Live 06 February 2024.

हॅशटॅग्स

Jio Financial Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x