
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. अल्पेक्स सोलर लिमिटेड कंपनीचा IPO लवकरच शेअर बाजारात लाँच होणार आहे. सौर ऊर्जा सोल्यूशन्स प्रदाता अल्पेक्स सोलर लिमिटेड कंपनीचा IPO 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. अँकर गुंतवणूकदार 7 फेब्रुवारी पासून या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात.
अल्पेक्स सोलर लिमिटेड कंपनीच्या IPO चा आकार 75 कोटी रुपये आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 109-115 रुपये निश्चित केली आहे. अल्पेक्स सोलर लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये 64,80,000 फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.
अँकर गुंतवणूकदारांसाठी कंपनीने 18.45 लाख इक्विटी शेअर्स राखीव ठेवले आहेत. तर मार्केट टॅक्ससाठी 3.24 लाख इक्विटी शेअर्स, NII साठी 9.24 लाख इक्विटी शेअर्स राखीव ठेवले आहेत, QIB साठी देखील अल्पेक्स सोलर लिमिटेड कंपनीने 12.31 लाख शेअर्स आणि 21.55 लाख इक्विटी शेअर्स रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा केली आहे.
अल्पेक्स सोलर लिमिटेड कंपनीने आपल्या IPO साठी कॉर्पोरेट कॅपिटल व्हेंचर्स कंपनीला बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. तर स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला या IPO इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, अल्पेक्स सोलर लिमिटेड कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 190 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच हा स्टॉक 305 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. ज्या गुंतवणुकदारांना हा IPO स्टॉक वाटप केला जाईल, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 165.22 टक्के नफा मिळू शकतो.
अल्पेक्स सोलर लिमिटेड कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेतून 19.55 कोटी रुपये सोलर मॉड्युल निर्मिती सुविधा अपग्रेड आणि विस्तार करण्यासाठी आणि तिची क्षमता 450 MW वरून 1.2 GW पर्यंत वाढवण्यासाठी खर्च करणार आहे. यासह कंपनी 12.94 कोटी रुपये सौर मॉड्यूल्सचे ॲल्युमिनियम फ्रेम बनवणारे नवीन उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी खर्च करणार आहे. तर उर्वरित 20.49 कोटी रुपये रक्कम कंपनीच्या खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी खर्च केली जाणार आहे.
अल्पेक्स सोलर लिमिटेड कंपनी मुख्यतः B2B मार्केटमध्ये सोलर पॅनेलचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी ल्युमिनस जॅक्सन आणि टाटा पॉवर यासारख्या दिग्गज कंपन्यांसाठी कंत्राटी उत्पादक म्हणून देखील काम करते. अल्पेक्स सोलर लिमिटेड कंपनी हिल्ड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड या सारख्या ईपीसी कंपन्यांना आपले उत्पादन पुरवठा करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.