19 May 2024 9:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

IFCI Share Price | कुबेर कृपा असलेला 65 रुपयाचा शेअर! 1 महिन्यात दिला 120 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या

IFCI Share Price

IFCI Share Price | मागील एका वर्षापासून सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. असाच एक सरकारी स्टॉक गुंतवणूकदारांच्या नजरेत आला आहे. या कंपनीचे नाव आहे, आयएफसीआय लिमिटेड. मागील एका वर्षात आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 65.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी आयएफसीआय स्टॉक 4.95 टक्के घसरणीसह 65.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आयएफसीआय कंपनीच्या शेअर्समधून मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. आयएफसीआय कंपनीचे शेअर्स अल्पकालीन ते दीर्घकालीन मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे. हे एक सकारात्मक संकेत आहे. आयएफसीआय स्टॉकने टेक्निकल चार्ट पॅटर्नवर MACD इंडिकेटरमध्ये क्रॉसओव्हरसह शून्य रेषा ओलांडली आहे. हे शेअरमधील सातत्यपूर्ण ताकद आणि सकारात्मक ट्रेंडचे महत्वपूर्ण लक्षण आहे. तज्ञांच्या मते, आयएफसीआय स्टॉक अप ट्रेण्डमध्ये 88 रुपये ते 93 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तर डाऊन ट्रेण्डमध्ये हा स्टॉक 58 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

मागील एका वर्षात आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 425 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एक वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 लाख रुपये झाले असते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे.

आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 71.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.03 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 16,252 कोटी रुपये आहे. IFCI लिमिटेड ही सरकारी कंपनी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. या कंपनीची स्थापना 1948 साली करण्यात आली होती. आयएफसीआय कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही निर्देशांकावर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFCI Share Price NSE Live 08 February 2024.

हॅशटॅग्स

IFCI Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x