15 May 2024 8:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

LIC Share Price | एलआयसी शेअर उच्चांकी पातळीवर पोहचला, पण शेअर्समधील तेजी कायम राहील? तज्ज्ञ काय म्हणाले?

LIC Share Price

LIC Share Price | एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या जीवन विमा कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या सरकारी कंपनीच्या शेअर्सने 1100 रुपये किंमत पार केली आहे. एलआयसी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.5 टक्क्यांच्या वाढीसह 1144.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. एलआयसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहे. आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी एलआयसी स्टॉक 1.14 टक्के घसरणीसह 1,092.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बुधवारी केंद्र सरकारने एलआयसीसह पीएसयू कंपनीच्या शेअर्समधील वाढीबाबत निवेदनात म्हटले की, “एलआयसी कंपनीच्या कामगिरीबद्दल अनेक विरोधक अफवा पसरवत होते. परंतु आता एलआयसी कंपनीच्या शेअर्सने विक्रमी किंमत पातळी स्पर्श केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हंटले की, सार्वजनिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपन्या आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. 2014 मध्ये भारतात एकूण 234 सार्वजनिक उपक्रम होते, आता त्यांची संख्या 254 झाली आहे.”

एलआयसी कंपनीचे शेअर्स मे 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. एलआयसी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 949.75 रुपये निश्चित केली होती. एलआयसी IPO च्या माध्यमातून भारत सरकारने 22.13 कोटी पेक्षा जास्त शेअर्स म्हणजेच जवळपास 3.5 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात विकले होते. आता भारत सरकारकडे एलआयसी कंपनीचे 96.5 टक्के भाग भांडवल आहे.

मागील पाच दिवसांत एलआयसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर यावर्षी जानेवारी महिन्यात एलआयसी स्टॉक 30 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात एलआयसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE Live 09 February 2024.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(98)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x