12 December 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

JP Associates Share Price | शेअरची किंमत 25 रुपये, अल्पावधीत दिला 224 टक्के परतावा, तज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

JP Associates Share Price

JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.9 टक्के वाढीसह 26.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. सलग 5 ट्रेडिंग सेशनमध्ये जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत होते.

मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी जेपी असोसिएट्स स्टॉक 2.90 टक्के घसरणीसह 25.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील सहा महिन्यांत जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 224.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 176.72 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, जेपी असोसिएट्स कंपनीच्या स्टॉकमध्ये 23.85 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण झाला आहे. जर हा स्टॉक या सपोर्ट लेव्हलच्या खाली गेला, तर शेअर 21 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, “जेपी असोसिएट्स स्टॉकमध्ये सपोर्ट लेव्हल 22 रुपये किमतीवर आहे आणि 27 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. तज्ञांनी या स्टॉकवर सध्या प्रॉफिट-बूकिंग करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील एका महिन्यासाठी या शेअरची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 20 रुपये ते 32 रुपये दरम्यान असेल.”

टिप्स 2 ट्रेड्स फर्मच्या मते, “जेपी असोसिएट्स स्टॉकमध्ये 27.4 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये सध्याच्या किंमत पातळीवर प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला आहे”. डिसेंबर 2023 तिमाही काळात जेपी असोसिएट्स कंपनीला 476.12 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षी याच तिमाही काळात कंपनीला 314.51 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Associates Share Price NSE Live 09 February 2024.

हॅशटॅग्स

JP Associates Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x