21 May 2024 8:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Federal Bank Share Price | झुनझुनवाला फॅमिलीचा खास मालामाल करणारा शेअर, तज्ञांकडून मजबूत टार्गेट प्राईस जाहीर

Federal Bank Share Price

Federal Bank Share Price | फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये तब्बल 8 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. मंगळवारी या बँकेचे शेअर्स 150 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या बँकिंग स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

वास्तविक, कोटक महिंद्रा बँकेने 19 फेब्रुवारी 2024 रोजी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या उच्च व्यवस्थापन मंडळात बदल केला आहे. त्यामुळे या बँकेचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते. आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी फेडरल बँक स्टॉक 0.13 टक्के घसरणीसह 154.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

फेडरल बँक स्टॉकमध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कोटक महिंद्रा बँकेने KVS Manian यांना सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले आहे. ते 1 मार्च 2024 पासून आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. दरम्यान फेडरल बँकेने देखील KVS Manian यांना बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व गोंधळामुळे फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फेडरल बँकेचे शेअर्स 7.97 टक्क्यांच्या घसरणीसह 150 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी कोटक महिंदा बँकेचे शेअर्स बीएसईवर 0.84 टक्क्यांच्या वाढीसह 1,746.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने फेडरल बँकेच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग दिली आहे.

तज्ञांच्या मते, फेडरल बँकचे शेअर्स पुढील काळात 165 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने फेडरल बँक स्टॉकवर 190 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या मते, फेडरल बँक स्टॉक 175 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

डिसेंबर 2023 तिमाहीत फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यात 25.3 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या तिमाहीत फेडरल बँकेने 1006.74 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत फेडरल बँकेने 803.61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. त्याच वेळी फेडरल बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 1956.5 कोटी रुपयेवरून 8.5 टक्के वाढीसह 2123.4 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी 31 डिसेंबर 2023 रोजी फेडरल बँकेचे 72,713,440 इक्विटी शेअर्स म्हणजेच 3.02 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमधील किमतीनुसार रेखा झुनझुनवाला यांच्या सर्व शेअर्सचे मूल्य 1,090 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Federal Bank Share Price NSE Live 21 February 2024.

हॅशटॅग्स

#Federal Bank Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x