IFSC: १ मे २०१५'ला मोदींनी मुंबईचा प्रस्ताव फेटाळला, पण फडणवीसांची हिंमत नव्हती

मुंबई, २ मे: देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होण्याचं स्वप्न मोदी सरकारने गुंडाळलं आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आयएफएससीचं मुख्यालय गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये होणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं असून याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट गिफ्ट सिटी आकारास येत आहे. त्यातच आता आयएफएससीचं मुख्यालय गांधीनगरला हलवल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी (IFSC) भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचे स्मरण होते अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आपलं आपयश लपवण्यासाठी तसंच एकही दमडीचं काम केलं नाही हे लपवण्यासाठी मोदी सरकारवर आरोप केले जात असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
यूपीए सरकारच्या काळातील राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळेच मुंबईतील IFSC केंद्र गुजरातमध्ये गेले असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. २०१४ पर्यंत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचा प्रस्ताव हा केवळ चर्चेच्या पातळीवर होता. या काळात महाराष्ट्र, गुजरात आणि बंगळुरू या राज्यांकडून IFSC केंद्रासाठी प्रस्ताव पाठवण्यात आले होते. मात्र, २०१४ साली केंद्रात भाजपची सत्ता आली. यानंतर १ मे २०१५ रोजी मोदी सरकारने मुंबई आणि बंगळुरुचा प्रस्ताव फेटाळून IFSC केंद्र अहमदाबादच्या गिफ्ट सिटीमध्ये स्थापन करायचे ठरवले.
त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एका शब्दानेही त्याला विरोध केला नाही. IFSC केंद्रावर मुंबईचा कशाप्रकारे नैसर्गिक हक्क आहे, हे त्यांनी मोदींना पटवून झाले नाही. कारण, त्यावेळी फडणवीस सरकारमध्ये मोदींसमोर काहीच बोलायची हिंमत नव्हती, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. यानंतर फडणवीसांनी केवळ एकदा विधानसभेत बोलताना मग आपण मुंबईत दुसरे IFSC केंद्र उभारू, अशी मोघम टिप्पणी केली. परंतु, २०१७ साली तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी या प्रस्तावाला स्पष्टपणे नकार दिला होता. पहिल्याच IFSC केंद्राची उभारणी झाली नसताना दुसऱ्या केंद्राचा घाट घालणे, हे व्यवहार्य नसल्याचे जेटलींनी त्यावेळी सांगितल्याची आठवण पृथ्वीराज चव्हाण यांनी करुन दिली.
News English Summary: On May 1, 2015, the Modi government rejected the proposal of Mumbai and Bangalore and decided to set up an IFSC center in Gift City, Ahmedabad. At that time, Devendra Fadnavis did not oppose him with a single word.
News English Title: PM Narendra Modi government wants bullet train to make travelling easier towards Gujrat IFSC Ahemdabad gift city News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Moschip Technologies Share Price | 10 रुपयाच्या पेनी शेअरने 3 वर्षात 481 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, आजही शेअर खरेदीला स्वस्त
-
Expleo Solutions Share Price | एक्स्प्लेओ सोल्युशन्स शेअर तेजीत, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
-
Budh Rashi Parivartan 2023 | बुध राशी परिवर्तन होतंय, 7 जूनपर्यंत या राशींना करिअरमध्ये मोठं यश आणि आर्थिक बळ मिळेल
-
HLE Glascoat Share Price | मालामाल शेअर! एचएलई ग्लासकोट शेअरने 4 वर्षात 1600% परतावा दिला, तर 10 वर्षात 10165% परतावा दिला
-
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअरमध्ये तुफानी वाढ, मागील एका महिन्यात 30.18 टक्के परतावा दिला, तेजीचे कारण काय?
-
MM Forgings Share Price | मल्टिबॅगर शेअर! एमएम फोर्जिंग्ज शेअरने तब्बल 4900 टक्के परतावा दिला, प्लस डिव्हीडंड मिळणार
-
Carysil Share Price | मालामाल होण्याची मोठी संधी! 96503 टक्के परतावा देणारा कॅरीसिल शेअर अजून 40 टक्के परतावा देऊ शकतो
-
PCBL Share Price | पीसीबीएल शेअरने 77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, आता अजून 31 टक्के परतावा देईल, डिटेल्स पहा
-
Tega Industries Share Price | टेगा इंडस्ट्रीज शेअरने 1 वर्षात 115% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 31% परतावा दिला, डिटेल्स पहा
-
Brand Rahul Gandhi | दक्षिण भारतानंतर हिंदी पट्ट्यात सुद्धा ब्रँड राहुल गांधी! मध्य प्रदेशात सुद्धा काँग्रेस 150 जागा जिंकत बहुमताने सत्तेत येणार?