8 September 2024 4:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Money | नोकरदारांनो! टेन्शन नको, मिळेल 50,000 रुपये पेन्शन; महिना खर्चाचं टेन्शन मिटेल - Marathi News Numerology Horoscope | सोमवार 09 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून महिन्याला EPF कट होतो? खात्यात जमा होणार 1 लाख रुपये - Marathi News PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच ओला इलेक्ट्रिक कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीचा IPO 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. ( ओला इलेक्ट्रिक कंपनी अंश )

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 72 ते 76 रुपये निश्चित केली आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 15.50 रुपये म्हणजेच 21 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल IPO मधे 3,79,15,211 इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत. तसेच ही कंपनी आपल्या IPO अंतर्गत 5,500 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. कंपनीचे प्रवर्तक आणि गुंतवणूकदार 8.49 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकणार आहेत.

OFS मध्ये शेअर्सची विक्री करणाऱ्या प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये मॅट्रिक्स पार्टनर्स इंडिया इन्व्हेस्टमेंट्स आणि अल्फा वेव्ह व्हेंचर या सारख्या मोठ्या संस्था सामील आहेत. या दोन्ही गुंतवणूक संस्था अनुक्रमे 37,27,534 आणि 37,82,883 इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. मॅट्रिक्स पार्टनर्स इंडिया कंपनीकडे ओला इलेक्ट्रिकचे एकूण 12,96,46,570 इक्विटी शेअर्स आहेत. ऑफर फॉर सेलमध्ये शेअर्स विकल्यावर त्यांच्याकडे एकूण 12,59,19,036 शेअर्स शिल्लक राहतील.

OFS मध्ये सामील होणाऱ्या इतर गुंतवणूकदारांमध्ये अल्पाइन अपच्युनिटी फंड आणि टेक प्रायव्हेट व्हेंचर्स XV या दोन कंपन्या आहेत. तसेच फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांनी देखील ओला इलेक्ट्रिक कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. फरहानकडे या कंपनीचे 2.70 कोटी रुपये मूल्याचे 3,55,683 इक्विटी शेअर्स आहेत. तर त्याची बहीण झोयाकडे 1.35 कोटी रुपये मूल्याचे 177841 शेअर्स आहेत.

ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या टॉप 10 अधिकाऱ्यांनी कंपनीचे जवळपास 10,850 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स धारण केले आहेत. ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या टॉप अधिकाऱ्यांमध्ये कंपनीचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी 1,36,18,75,240 इक्विटी शेअर्स होल्ड केले आहेत. अप्पर प्राइस बँडनुसार त्यांच्या शेअरचे एकूण मूल्य 10,350 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of Ola Electric Ltd 01 August 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x