2 May 2024 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
x

Stock To Buy | छोटा रिचार्ज बडा धमाका, 10 रुपयांच्या स्टॉकची कमाल, गुंतवणूकदारांना 1468 टक्के परतावा, खरेदी करावा का?

Stock to buy

Stock To Buy | बँक ऑफ बडोदाचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात 12 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. दिवसा अखेर या बँकिंग स्टॉकची किंमत जवळपास 10 टक्के वाढीसह 158.25 रुपयांवर क्लोज झाली होती. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या सकारात्मक निकालानंतर शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत, बँकेचा बुडीत कर्जांमध्ये घट झाली आणि व्याज उत्पन्नात मजबूत वाढ झाल्यामुळे शेअर्समध्ये अप्रतिम तेजी दिसून आली आहे. आयसीआयसीआय डायरेक्ट रिसर्चने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, चांगल्या तिमाही निकालामुळे शेअर्समध्ये पुढील काही दिवस तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मने बँक ऑफ बडोदा स्टॉकला ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 170 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

सप्टेंबर तिमाहीचे निकाल :
चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाचा निव्वळ नफा 59 टक्क्यांनी वाढला असून 3,313 कोटी रुपयांवर गेला आहे. चांगली आवक आणि व्याजातून झालेली उत्पन्न वाढ यामुळे बँकेच्या नफ्यात मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँक ऑफ बडोदा बँकेने 2,088 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत बँक ऑफ बडोदाचे एकूण उत्पन्न मागील वर्षीच्या 20,270.74 कोटी रुपये होते, आणि त्यात वाढ होऊन उत्पन्न 23,080.03 कोटी रुपये झाले आहे. बँक ऑफ बडोदाच्या निव्वळ व्याज उत्पन्नात 34.5 टक्क्यांची वाढ झाली असून, बँकेचे उत्पन्न 10,714 कोटी रुपयेवर गेले आहे. सप्टेंबर 2022 च्या अखेरीस बँकेचा NPA सकल प्रगतीच्या आधारावर 5.31 टक्‍क्‍यांवर घसरले आहे. बँकेचा NPA एक वर्षापूर्वी याच कालावधीत 8.11 टक्‍के एवढा जास्त होता. त्याच वेळी, बँकेच्या निव्वळ NPA मध्ये 2.83 टक्क्यांवरून 1.16 टक्क्यांपर्यंत घट पाहायला मिळाली आहे.

शेअरची आतपर्यंत वाटचाल :
बँक ऑफ बडोदाने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 1,468.38 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 वर्षांपूर्वी जानेवारी 1999 रोजी NSE निर्देशांकावर BOB चे शेअर्स 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या बँकेचे शेअर्स शेअर्स 158.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कालावधीत बँकेच्या शेअरनी आपल्या शेअर धारकांना 1,468.38 टक्के परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच, जर तुम्ही या स्टॉकमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली असती तर आज तुम्हाला एक लाख रुपये गुंतवणुकीवर 16 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता. या वर्षी YTD मध्ये बँक ऑफ बडोदाच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 88.84 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Bank Of Badoda Stock to buy recommended by Stock market expert for huge returns on investment on 08 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x