Mutual Fund Investment | म्युच्युअल फंडात SIP गुंतवणुक करून पैसा वेगाने कसा वाढवू शकता?, हे तीन सुपरहिट फॉर्म्युले जाणून घ्या आणि श्रीमंत व्हा

Mutual Fund Investment | SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून चांगला परतावा कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला दीर्घकाळासाठी नियमित गुंतवणूक करावी लागेल. शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता असूनही जर तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम SIP मध्ये जमा करत राहिलात, तर तुमच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मूल्य तुम्हाला चांगला परतावा मिळवून देईल. SIP मध्ये गुंतवणूक करण्या आधी काही खास ट्रिक्स जाणून घेऊ
एसआयपी ट्रिक्स : जर तुम्ही म्युच्युअल फंडातील SIP गणना समजून त्यात गुंतवणूक केली तर तुम्ही दीर्घकाळात चांगला परतावा कमवू शकता. म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे एक सूत्र आहे, तज्ञ आणि गुंतवणूकदार नेहमी म्युचुअल फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. या विशेष सूत्रानुसार जर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक केल्यास 30 वर्षांत तुम्ही 10 कोटींहून अधिक नफा कमवू शकता. यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडाचे तीन नियम जाणून घेणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडात SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करण्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, त्यात तुम्हाला परतावा मिळतोय हे कळण्यासाठी खूप वेळ लागेल.
चला तर मग जाणून घेऊ, SIP गुंतवणुकीचे सूत्र
गुंतवणुकीचे पहिले सूत्र :
म्युचुअल फंड गुंतवणूक सल्लागाराचे मत आहे की, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी एक खास सूत्रे वापरले जाते, पहिले सूत्र 15X15X15 आहे. या सूत्रानुसार, जर तुम्ही 15 टक्के व्याज परतावा दराने 15 वर्षे नियमित दरमहा 15,000 रुपये गुंतवले तर दीर्घकाळात तुम्ही 1.02 कोटी रुपयांची रक्कम जमा होईल. म्हणजेच ह्या सूत्रानुसार तुम्ही दीर्घकाळात करोडपती होऊ शकतात.
गुंतवणुकीचे दुसरे सूत्र :
म्युचुअल फंड गुंतवणुकीचे दुसरे सूत्र म्हणजे 15X15X30 आहे. या सूत्रानुसार, जर तुम्ही 15 टक्के व्याज परताव्याच्या दराने 30 वर्षे दरमहा नियमित 15 हजार रुपये SIP गुंतवणूक करता, तर तुम्हाला दीर्घकाळात 10.51 कोटी रुपयांचा परतावा मिळेल. या दरम्यान, तुमची गुंतवणूक रक्कम 54 लाख रुपये असेल,त्यात गुंतवणुकीवर मिळणारा एकूण व्याज 9.97 कोटी रुपये होईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेवढ्या जास्त कालावधीसाठी म्युच्युअल फंडात SIP गुंतवणूक कराल, तितका जास्त नफा कमावत येईल. तथापि, प्रत्येक व्यक्तीने आपल्या आर्थिक क्षमतेनुसार,लक्ष कालावधी आणि उत्पन्नानुसार SIP गुंतवणूक करावी. SIP तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणुकीतून जबरदस्त परतावा देईल.
उशिरा गुंतवणुकीचे तोटे :
जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी SIP गुंतवणूक करायला सुरु केले तर त्याचा परिणाम तुमच्या नफ्यावर होणारच. चक्रवाढ व्याज पद्धतीने तुम्हाला पाच वर्षाचा व्याज कमी मिळेल. उशिरा गुंतवणूक केल्यास त्याचा विपरीत परिणाम होतो हे एक छोटा हिशेब करून समजून घेऊ.
समजा गुंतवणूक सुरू करताना तुमचे वय 30 वर्षे असेल, आणि तुम्ही पुढील 25 वर्षांसाठी दरमहा 5000 SIP गुंतवणूक केली तर अशा परिस्थितीत, सरासरी 12 टक्के व्याज परताव्याच्या आधारावर, तुम्हाला योजना परिपक्वतेच्या वेळी एकूण 84,31,033 रुपये परतावा मिळेल. यावेळी तुमचे वय 55 वर्षे असेल, आणि जर तुम्ही पाच वर्ष आधी गुंतवणूक केली असती तर, तुम्हाला जास्त व्याज परतावा मिळाला असता.
जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी SIP गुंतवणूक सुरू केली तर तुमचा गुंतवणुकीचा कालावधी 30 वर्षांचा झाला असता. मागील 10 वर्षांच्या परतावा रेकॉर्डनुसार, SIP गुंतवणुकीतून लोकांना सरासरी 15 टक्के परतावा मिळाला आहे. परंतु जर आपण येथे सरासरी 12 टक्के परताव्याच्या आधारावर गणना केली तर योजना परिपक्वतेच्या वेळी तुम्हाला एकूण 1,52,60,066 रुपये परतावा मिळेल. म्युचुअल फंड ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. ह्यात तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून जास्त परतावा कमवू शकता.
जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षापासून SIP गुंतवणूक सुरू केली, तर तुम्हाला 68,29,033 रुपये परतावा मिळेल. जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी SIP गुंतवणूक सुरू केली असती, तर तुम्हाला एवढं परतावा मिळाला नसता.
परताव्याच्या आधारावर टॉप 10 म्युच्युअल फंड आणि परतावा :
1. SBI स्मॉलकॅप म्युच्युअल फंड : 20.04 टक्के
2. Nippon India स्मॉल कॅप म्युच्युअल फंड : 18.14 टक्के
3. इन्वेस्को इंडिया मिडकॅप म्युच्युअल फंड : 16.54 टक्के
4. कोटक इमर्जिंग इक्विटी म्युच्युअल फंड : 15.9 टक्के
5. DSP म्युच्युअल फंड योजना: 15.27 टक्के
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Mutual fund Investments in SIP gives huge return in long term on 27 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Mangalam Seeds Share Price | जबरदस्त शेअर! 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा
-
Gold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या
-
360 ONE WAM Share Price | मस्तच! तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड
-
Goldstone Technologies Share Price | मस्तच! जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
-
Sharda Cropchem Share Price | जोरदार कमाई! या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स
-
Accelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा
-
Comfort Intech Share Price | बापरे! 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा
-
Stocks To Buy | बँक FD वार्षिक व्याजापेक्षा चौपट परतावा देतील हे 4 शेअर्स, येथे पैसा वाढवा
-
Sunflag Iron & Steel Company Share Price | शेअर बाजार पडला तरी हा शेअर वाढतोय, भारत सरकारही आहे क्लाईंट, स्टॉक डिटेल्स पहा
-
Shukra Rashi Parivartan | 15 फेब्रुवारीपर्यंत या 7 राशींच्या लोकांवर शुक्राची कृपा राहील, तुमची राशी आहे त्यात?