12 December 2024 12:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Titagarh Wagons Share Price | टिटागढ़ रेल सिस्टीम्स शेअरमध्ये बंपर तेजी येणार? फायदा घेण्यासाठी नेमकं कारण जाणून घ्या

Titagarh Wagons Share Price

Titagarh Wagons Share Price | टिटागढ़ रेल सिस्टीम्स आणि भारत सरकारच्या मालकीच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्स मध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. Titagarh Rail Systems आणि BHEL कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या कन्सोर्टियमने वंदे भारत गाड्या बनवण्याचा करार केला आहे. टिटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 432 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या पातळी किमतीवर ट्रेड करत होते.

शुक्रवारी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 86.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. BHEL कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 91.45 रुपये होती. तर या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 41.40 रुपये होती.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि Titagarh Rail Systems यांनी संयुक्तपणे केलेला हा सर्वात मोठा करार आहे. या करारात 80 पूर्णपणे असेंबल केलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची निर्मिती आणि पुरवठ्याचे काम देण्यात आले आहे. या रेल्वे गाड्याचा पुरवठा 2029 पर्यंत पूर्ण करायचा आहे. पुढील 35 वर्षे त्यांची देखभाल देखील करायची आहे. भारतीय रेल्वेने भारतीय कंपन्यांना संयुक्तपणे एवढ्या मोठ्या मूल्याचे कंत्राट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कराराचे मूल्य तब्बल 24,000 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titagarh Wagons Share Price today on 17 June 2023.

हॅशटॅग्स

Titagarh Wagons Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x