
ITC Share Price | एकेकाळी आयटीसी कंपनीच्या शेअर्सबाबत गमतीशीर मीम्स व्हायरल होत असायचे. या कंपनीचे शेअर्स नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत असत. शेअर बाजार पडला की, आयटीसी स्टॉक तेजीत यायचा, आणि शेअर बाजार वाढला की आयटीसी स्टॉक पडायचा. त्यामुळे गुंतवणुकदार नेहमी या स्टॉकची मस्करी करत असत.
मात्र साबण, सिगारेट, मैदा, बिस्किटे हे FMCG उत्पादने बनवणाऱ्या आयटीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात आयटीसी स्टॉक 500 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी आयटीसी स्टॉक 0.90 टक्के वाढीसह 407 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने आयटीसी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 515 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयटीसी कंपनीचे शेअर्स 407 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 410.05 रुपये किमतीवर पोहचला आहे. आणि दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 406 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील एका वर्षभरात आयटीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 7 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 25 वर्षात आयटीसी कंपनीचे शेअर्स 16.94 रुपये या किमतीवरून 2315 टक्के वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 499.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 369.65 रुपये होती.
शेअर बाजारातील अनेक गुंतवणूक सल्लागार आयटीसी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मक पाहायला मिळत आहे. 36 तज्ञापैकी 15 जणांनी आयटीसी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर इतर 17 जणांनी या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी आयटीसी कंपनीचे 43.26 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. परकीय गुंतवणूकदारांचा वाटा डिसेंबर 2023 तिमाहीत 43.34 टक्केवर आला आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आयटीसी कंपनीमधील आपला वाटा 31.08 टक्केवरून वाढवून 31.26 टक्केवर नेला आहे. तर सार्वजनिक गुंतवणुकदार आणि रिटेल गुंतवणूकदारांचा वाटा 25.48 टक्के आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे भाग भांडवल धारण केलेले नाही.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.