27 November 2022 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन? Investment Tips | सरकारी योजनेत नो टेन्शन, ही योजना 44 रुपये जमा करून देईल 27 लाख परतावा, स्कीम डिटेल वाचा
x

Stocks To Buy | बक्कळ पैसा कमावून देणार, टॉप 5 शेअरची यादी सेव्ह करा, स्टॉक सुसाट तेजीत येणार, टार्गेट प्राईस?

Stock to Buy

Stocks To Buy | JM फायनान्शियल फर्मने अशा 5 शेअर्सची निवड केली आहे, जे अल्पावधीत तुम्हाला मजबूत परतावा कमावून देऊ शकता. जेएम फायनान्शियल ही एक स्टॉक मार्केटमध्ये संशोधन करणारी कंपनी आहे. शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल आल्यानंतर या फर्मने 5 कंपन्यांच्या स्टॉकची निवड केली आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शिअल फर्मला विश्वास आहे की या 5 कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात अप्रतिम कामगिरी करतील. या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केल्यास तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. चला जाणून घेऊ या 5 कंपन्याच्या स्टॉकबद्दल.

ONGC :
तज्ञांनी या कंपनीचे स्टॉक बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ONGC चे तिमाही निकाल चांगले आले होते त्यामुळे तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या ओएनजीसी कंपनीचा शेअर 135 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. पण जेएम फायनान्शियल फर्मने ONGC कंपनीचे स्टॉक 205 रुपये या लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

ABB India :
JM Financial फर्मने ABB India कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चांगले तिमाही निकाल आल्यानंतर, जेएम फायनान्शिअल फॉर्मने या स्टॉकची पुढील लक्ष किंमत 3,350 रुपये निश्चित केली आहे. ही लक्ष किंमत लक्षात ठेवा आणि ABB India स्टॉक खरेदी करा. सध्या एबीबी इंडिया कंपनीचा शेअर 3,070.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बायोकॉन :
या कंपनीच्या शेअर बाबत तज्ञ सकारात्मक दिसत असून त्यांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बायोकॉन कंपनीने उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केले होते. यामुळे जेएम फायनान्शियल फर्मने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बायोकॉन कंपनीचा शेअर पुढील काळात 395 रुपये किमतीवर जाऊ शकतो, असा अंदाज जेएम फायनान्शियलने व्यक्त केला आहे. सध्या हा स्टॉक 282 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

माइंडस्पेस REIT :
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत माइंडस्पेस बिझनेस पार्क REIT ने अप्रतिम निकाल जाहीर केले होते. यामुळे जेएम फायनान्शियल फर्मने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. JM Financial फर्मने या कंपनीच्या शेअरसाठी 375 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. त्याच वेळी, माइंडस्पेस REIT कंपनीचा शेअर सध्या 344 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अपोलो टायर्स :
जेएम फायनान्शिअल फर्मने अप्रतिम तिमाही निकालाचा हवाला देत अपोलो टायर्स कंपनीच्या शेअरवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शिअल फर्मने म्हटले आहे की कंपनीचे तिमाही निकाल पाहिले तर हा स्टॉक पुढील काळात 350 रुपये किंमतीपर्यंत जाऊ शकतो. सध्या अपोलो टायर्स कंपनीचा शेअर 284.10 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Top 5 Stock to Buy has announced by JM financial for short term investment on 24 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x