6 May 2024 4:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये पुन्हा अप्पर सर्किट मालिका सुरु? नवीन ऑर्डर मिळताच टार्गेट प्राईस जाहीर

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या अक्षय ऊर्जा सोल्यूशन प्रदाता कंपनीच्या शेअरमध्ये गुरुवारी मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 40.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही दिवसापासून विक्रीच्या दबावात ट्रेड करणाऱ्या सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये अचानक तेजी पाहून गुंतवणूकदार देखील उत्साही झाले होते. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

शेअर्समध्ये अचानक तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. गुरूवार दिनांक 7 March 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.91 टक्के वाढीसह 40.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला जुनिपर ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 72.45 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरनुसार, सुझलॉन एनर्जी कंपनीला गुजरात राज्यात द्वारका येथील साइटवर प्रत्येकी 3.15 मेगावॅट क्षमतेचे हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर टॉवर आणि 23 विंड टर्बाइन जनरेटर स्थापन करण्याचे काम देण्यात आले आहे. ही ऑर्डर सुझलॉन कंपनीच्या 3.15 मेगावॅट क्षमतेच्या S144-140M टर्बाइन लाइनमधील मोठ्या रेटेडसाठी आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनी विंड टर्बाइनचा पुरवठा करणे आणि प्रकल्प कार्यान्वित करणे तसेच सर्वसमावेशक ऑपरेशन आणि देखभाल सेवा प्रदान करणार आहे.

मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 373 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच जेएम फायनान्शियल फर्मने आपल्या अहवालात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर 54 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 08 March 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(135)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x