
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या कपन्यांच्या बहुतांश शेअर्सची किंमत 500 रुपयेपेक्षा जास्त आहे. मात्र अदानी विल्मर स्टॉकची किंमत मागील एका वर्षापासून 400 रुपयेपेक्षा खाली ट्रेड करत आहे. अनेक ब्रोकरेज फर्म अदानी विल्मर स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत.
एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 358-369 रुपये किमतीवर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 402 रुपये ते 438 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी विल्मर स्टॉक 0.028 टक्के वाढीसह 360.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
तज्ञांनी अदानी विल्मर स्टॉक खरेदी करताना 345 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. सध्या अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 360-370 रुपये दरम्यान ट्रेड करत आहेत. 24 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 509.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
20 नोव्हेंबर 2023 रोजी अदानी विल्मर कंपनीचे शेअर 285.85 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. अदानी विल्मर कंपनीचे 87.87 टक्के भाग भांडवल प्रवर्तकांनी धारण केले आहे. तर 12.13 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांनी धारण केले आहे.
डिसेंबर 2023 तिमाहीत उत्पन्नात घट झाल्यामुळे अदानी विल्मर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 18 टक्क्यांची घसरण झाली आहे. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 200.89 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत अदानी विल्मर कंपनीचा निव्वळ नफा 246.16 कोटी रुपये नोंदवला गेला होता. डिसेंबर 2023. तिमाहीत या कंपनीने 12,887.60 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 15,515.55 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. अदानी विल्मर ही कंपनी फॉर्च्यून ब्रँड अंतर्गत खाद्यतेल आणि इतर अनेक खाद्यपदार्थ विकण्याचा व्यवसाय करते. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीने विल्मार इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीसोबत अदानी विल्मर ही कंपनी संयुक्तरित्या स्थापन केली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.