
Vikas Ecotech Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. शुक्रवारी BSE सेन्सेक्स निर्देशांक 15 अंकांच्या घसरणीसह 73142 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 5 अंकांच्या घसरणीसह 22212 अंकांवर बंद झाला होता.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स कमजोरीसह 4.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 641 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5.65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.35 रुपये होती. सोमवारी हा शेअर 2.15% वाढून 4.75 रुपयांवर ट्रेड करत आहे.
मागील एका महिन्यात विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2.85 रुपये किंमत पातळीवरून 63 टक्के वाढली आहे. नुकताच विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने सेबीला माहिती दिली की, त्यांनी पॉलिमर प्लास्टिक सिझर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे 100 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे.
विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार पॉलिमर प्लास्टिक सिझर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विकास ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये विलीन करण्यात येणार आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने पॉलिमरिक प्लॅस्टिकायझर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे अधिग्रहण 32 कोटी रुपयेला केले आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने पॉलिमेरिक प्लास्टीसायझर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे मालकी हस्तांतरण विकास ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे पूर्ण केले आहे.
विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नवीन कंपनीचे अधिग्रहण केल्याने कंपनीच्या व्यवसायात लक्षणीय वाढ होणार आहे. विकास इकोटेक कंपनीने ऑगस्ट-सप्टेंबर 2021 पासून कर्ज परतफेडीला सुरुवात केली आहे. विकास इकोटेक लिमिटेड ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त होण्याच्या प्रक्रियेत आहे. आतापर्यंत कंपनीने 126.2 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहे. कंपनीवर आता बँकांचे 35 कोटी रुपये कर्ज शिल्लक आहे. कंपनीने आतापर्यंत आपले 78 टक्के कर्जे परतफेड केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.