12 December 2024 4:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Gensol Engineering Share Price | अजून काय हवं राव? जेनसोल इंजिनिअरिंग शेअर्सनी 2 वर्षात 3300 टक्के परतावा दिला, डिटेल्स नोट करा

Gensol Engineering Share Price

Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून मजबूत तेजी पाहायला मिळत होती. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1850 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर काही वेळात हा स्टॉक 1899 रुपये किमतीवर पोहोचला आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. आज गुरूवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 0.94 टक्के घसरणीसह 1,775.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जून तिमाही कामगिरी :

जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीने नुकताच आपले एप्रिल ते जून 2023 या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून 2023 तिमाहीत जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीने 151.70 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील एका वर्षभरात कंपनीच्या महसुलात 47 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या EBITDA मध्ये वार्षिक आधारावर 179 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कालावधीत कंपनीचा EBITDA 43.70 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील एका वर्षभरात जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30.76 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 2 वर्षांत शेअरने 3300 टक्के परतावा दिला

मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअरने तुफान वाढ नोंदवली आहे. कोविड- 19 लॉकडाऊनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 60 रुपयेवर आली होती. तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 1899 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 3300 टक्के परतावा कमावून दिला आहे. जेनसोल इंजिनिअरिंग या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2264 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1,899.00 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1,310.25 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gensol Engineering Share Price today on 17 August 2023.

हॅशटॅग्स

#Gensol Engineering Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x