22 May 2024 1:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

Adani Green Share Price | मल्टिबॅगर अदानी ग्रीन शेअर्स पुन्हा मोठा परतावा देणार, कंपनीकडून मोठी अपडेट आली

Adani Green Share Price

Adani Green Share Price | मागील काही महिन्यापासुन अदानी ग्रीन कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली सुरू झाली आहे. नुकताच फिंच रेटिंग्स फर्मने अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आरजी-1 ग्रूप कंपनीच्या 2042 मध्ये देय असलेल्या 18 वर्ष मुदतीच्या सिक्युअर नोट्सला ‘BBB-(EXP)’ रेटिंग बहाल केली आहे.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने आपल्या पाच वर्ष मुदत असलेल्या ‘बुलेट USD500 मिलियन सीनियर सिक्युअर नोट्स’ ला 2024 मध्ये रिफाइनांस करण्याची योजना आखली आहे. आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 2.80 टक्के घसरणीसह 1,924.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अदानी ग्रीन एनर्जी आरजी-1 ग्रूपमध्ये 930MW क्षमतेच्या पॉलीक्रिस्टलाइन सौर ऊर्जा प्रकल्पांचा समावेश होतो. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचा आरजी-1 ग्रुप ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचा विकास करण्यासाठी सुमारे 4 अब्ज डॉलर्स भांडवल उभारणी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीची संपूर्ण मालकी असलेल्या अदानी न्यू इंडस्ट्रीज कंपनी भारतातील आणि आंतरराष्ट्रीय बँकांद्वारे भांडवल उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंपनीने विविध बँकांशी चर्चा करायला सुरुवात केली आहे.

जून 2023 मध्येच फ्रान्सच्या टोटल एनर्जी आणि अदानी ग्रुपने भारतात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन करण्यासाठी 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी माहिती दिली की, अदानी ग्रीन एनर्जी कंपनी आपल्या एकूण भांडवली खर्चापैकी 75 टक्के रक्कम हरित ऊर्जा निर्मिती व्यवसायावर खर्च करणार आहे. पुढील दहा वर्षात अदानी ग्रीन एनर्जी कंपनी अक्षय ऊर्जा, ग्रीन कंपोनेंट मँन्यूफॅक्चरिंग आणि संबंधित पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Share Price NSE Live 28 February 2024.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x