
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. नुकताच कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला माहिती दिली आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी आणि वॉल्ट डिस्ने यांच्या विलीनीकरणबाबत मीडियामध्ये काही खोट्या बातम्या दाखवल्या जात आहेत. यावर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपले स्पष्टीकरण जाहीर केले आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, वॉल्ट डिस्ने आणि रिलायन्स कंपनीने भारतात त्यांचे मीडिया ऑपरेशन्स विलीन करण्याबाबत करार केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार रिलायन्स कंपनीचा मीडिया विभाग 61 टक्के ठेवून आणि वॉल्ट डिस्नेला उर्वरित वाटा देऊन विलीनीकरण करार करणार आहे. मात्र, आता रिलायन्स कंपनीने हे वृत्त फेटाळून लावले आहे.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3000 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली झाली आहे. आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 1.89 टक्के घसरणीसह 2,915 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. नुकताच या कंपनीने 3000 रुपये किंमत स्पर्श केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी बीएसई सेन्सेक्स निर्देशांकाच्या तुलनेत मजबूत परतावा कमावून दिला आहे. नुकताच एलारा सिक्युरिटीज फर्मने रिलायन्स कंपनीच्या शेअर्सवर 3354 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली. ब्रोकरेज फर्मच्या मते, आर्थिक वर्ष 2024-25 आणि आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सचा EPS आउटलुक अनुक्रमे 4 टक्के आणि 5 टक्के पर्यंत जाऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.