15 December 2024 1:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Tata Group Share | नो घाटा कारण आमचा स्टॉक टाटा! सध्या चर्चेत असलेल्या या शेअरवर ब्रोकरेजकडून नवी टार्गेट प्राईस

Tata group Share

Tata Group Share | बुधवारच्या इंट्राडे ट्रेडमध्ये टाटा पॉवर कंपनीच्या शेअर फुल्ल पॉवरमध्ये ट्रेड करत होते. आज गुरुवारी टाटा पॉवर कंपनीचा शेअर्स 222 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ब्रोकरेज फर्म टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉक बाबत सकारात्मक असून त्यांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. प्रभुदास लिलाधर फर्मच्या रिपोर्टनुसार टाटा पॉवरच्या स्टॉकमध्ये तेजी येऊ शकते. काल टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांची वाढीसह 222.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Power Company Share Price | Tata Power Company Stock Price | BSE 500400 | NSE TATAPOWER)

टाटा पॉवरबद्दल तज्ञांचे मत :
प्रभुदास लिलाधर फर्मला विश्वास आहे की, स्टॉकमध्ये आणखी चढ उतार येऊ शकतो. मध्यम मुदतीसाठी स्टॉक खरेदी केल्यास चांगला परतावा होईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. एक दिवस आधी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 1.7 टक्क्यांच्या वाढीसह 222.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा पॉवर कंपनीचे बाजार भांडवल 71,064 कोटींहून अधिक आहे.

स्टॉकची लक्ष किंमत 244 रुपये :
प्रभुदास लिलाधर फर्मने आपल्या स्टॉक मार्केट रिपोर्टमध्ये म्हंटले आहे, ” अल्प सुधारणेनंतर टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉक 215 रुपये या आपल्या ट्रेंडलाइन सपोर्ट झोनकडे गेला आहे. स्टॉकमध्ये चॅनल पॅटर्नच्या आत जाण्यासाठी पुलबॅक दिसला आहे. टाटा पॉवर स्टॉकमध्ये दैनंदिन चार्ट पॅटर्न नुसार आगामी काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील काळात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत 240-244 रुपये पर्यंत वाढू शकते. असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर स्टॉकसाठी 244 रुपये ही लक्ष किंमत निश्चित केली असून त्यावर 214 रुपयेचा स्टॉप लॉसही दिला आहे.

टाटा पॉवरचा तिमाही नफा :
आज Tata Power कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 222 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सलग चार दिवसांच्या कमजोरीनंतर टाटा पॉवर स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे बाजार भांडवल 69,850 कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 85 टक्क्यांची वाढ झाली असून, कंपनीने 935.18 कोटी रुपये नफा कमावला आहे. 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 505.66 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Power Share price has increased and Prabhudad kilasha Brokerage firm has given new Target price with stop loss on 15 December 2022.

हॅशटॅग्स

Tata Share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x