
Bonus Shares | ग्राउर वेल इंडिया लिमिटेड या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. या मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या कंपनीचे शेअर्स 200 रुपयांपेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी ग्राउर वेल इंडिया कंपनीचे शेअर्स 1.72 घसरणीसह 186.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. Grauer and Weil Share Price
ग्राउर वेल इंडिया कंपनीने सेबीलां दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणुकदारांना एका शेअरवर एक बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. मात्र, कंपनीने अद्याप बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. ग्राउर वेल इंडिया ही कंपनी 2007 पासून आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने लाभांश वाटप करत आहे. मात्र बोनस शेअर्स वाटप करण्याची पहिलीच वेळ आहे.
मागील एका वर्षात ग्राउर वेल इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 101 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के नफा कमावून दिला आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 51 पैसे किमतीवर ट्रेड करत होते.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची वार्षिक उच्चांक किंमत 202 रुपये होती. तर नीचांक किंमत 88.85 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4447.97 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.