
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची प्राईस बँड 78 रुपये ते 83 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. या कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये असेल. पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग कंपनीचा IPO 7 मार्च ते 12 मार्च 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. कंपनीने आपल्या एका IPO लॉटमध्ये 1,600 शेअर्स ठेवले आहेत. Pune E-Stock Broking IPO
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 70 रुपये प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहे. म्हणजेच ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 153 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. याचा अर्थ गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 85 टक्के नफा मिळू शकतो. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये नुसार पुणे ई-स्टॉक ब्रोकरेज कंपनी मुख्यतः कॉर्पोरेट ब्रोकरेजचा व्यवसाय करते.
पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग कंपनीचे ग्राहक दहापेक्षा जास्त शहरांमध्ये पसरले आहेत. यामध्ये नोंदणीकृत व्यक्ती आणि गुंतवणूक संस्था यांचा देखील समावेश आहे. मार्च 2023 पर्यंत कंपनीकडे एकूण 60,640 ग्राहक होते. या कंपनीच्या मुख्य शाखा दिल्ली आणि अहमदाबाद येथे कार्यरत आहे.
RHP नुसार, शेअर्स इंडिया सिक्युरिटीज लिमिटेड, ICICI सिक्युरिटीज लिमिटेड, आणि एंजल वन लिमिटेड यासारख्या कंपन्या पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग कंपनीच्या सूचीबद्ध स्पर्धक कंपन्या आहेत. 31 मार्च 2022 ते 31 मार्च 2023 दरम्यान, पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड कंपनीचा PAT 4.69 टक्के कमी झाला आहे. तर कंपनीचे महसूल संकलन 12.06 टक्के कमी झाले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.