16 February 2025 12:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Paytm Share Price | पेटीएम शेअरबाबत मोठे संकेत, मजबूत कमाई होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: PAYTM Zomato Share Price | झोमॅटो शेअर ₹400 टार्गेट प्राईस गाठणार, तज्ज्ञांनी दिले संकेत, अपडेट नोट करा - NSE: ZOMATO ITC Share Price | 2320 टक्के परतावा देणारा आयटीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: ITC Numerology Horoscope | रविवार, 16 फेब्रुवारी 2025, अंकज्योतिषशास्त्रानुसार तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या EPFO Passbook | पगारदारांनो, आता तुम्हाला EPF खात्यातून एकाच वेळी इतकीच रक्कम काढण्याची मुभा, इथे पहा अपडेट Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत फायद्याची बातमी, धावणार शेअर, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL Loan EMI Alert | कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडायचं आहे, EMI भरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह डिटेल्स जाणून घ्या

IPO GMP

IPO GMP | डॉ. अग्रवाल हेल्थकेअर लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. डॉ. अग्रवाल हेल्थकेअर लिमिटेड कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 3,027 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. डॉ. अग्रवाल हेल्थकेअर लिमिटेड कंपनी आयपीओ 29 जानेवारी रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.

डॉ. अग्रवाल हेल्थकेअर कंपनीने या आयपीओसाठी 382 ते 402 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केली आहे. हा आयपीओ ३१ जानेवारीपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल.

आयपीओ डिटेल्स

डॉ. अग्रवाल हेल्थकेअर कंपनी आयपीओमध्ये ३०० कोटी रुपयांचे नवे शेअर्स आणि २,७२७.२६ कोटी रुपयांचे ६.७८ कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल यांचा समावेश आहे. डॉ. अग्रवाल हेल्थकेअर कंपनी आयपीओची एकूण साइज 3,027.26 कोटी रुपये आहे.

आयपीओ निधीचा वापर कुठे करणार

डॉ. अग्रवाल हेल्थकेअर कंपनी आयपीओ निधीतील १९५ कोटी रुपयांची रक्कम कर्जाच्या परतफेडीसाठी वापरणार आहे. तसेच निधीतील काही भाग सामान्य कॉर्पोरेट कामकाज आणि दुसऱ्या कंपनीच्या अधिग्रहणासाठी खर्च केला जाणार आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के राखीव

डॉ. अग्रवाल हेल्थकेअर लिमिटेड आयपीओसाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही बोली लावता येणार आहे. या आयपीओमध्ये ५०% हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव असेल. तसेच ३५ टक्के हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १५ टक्के हिस्सा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

आयपीओ शेअरचा सध्याचा जीएमपी

अनलिस्टेड मार्केटमधून प्राप्त झालेल्या अपडेटनुसार, डॉ. अग्रवाल हेल्थकेअर आयपीओ शेअरचा सध्याचा जीएमपी ६० रुपये आहे. सध्याच्या जीएमपीनुसार आयपीओ शेअर कमीतकमी 462 रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Dr Agarwals Health Ltd Saturday 25 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x