19 May 2024 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर चार्टवर तेजीचे संकेत, अल्पावधीत मजबूत कमाई होईल, टार्गेट प्राइस जाहीर

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मागील काही दिवसापासून सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. नुकताच सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला 3 मेगावॅट क्षमतेच्या 10 विंड टर्बाइनचा पुरवठा करण्याची एक ऑर्डर मिळाली आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीला ही ऑर्डर EDF Renewables कंपनीने दिली आहे. हा 130 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प गुजरात राज्यात उभारला जाणार आहे. आणि या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीला विकली जाणार आहे. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.55 टक्के घसरणीसह 44.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 60 रुपये किमतीवर जाऊ शकतात. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर दैनिक चार्टवर सकारात्मक वाढीचे संकेत देत आहेत. ज्या गुंतवणुकदारांनी पूर्वीच गुंतवणूक करून ठेवली आहे, त्यांना तज्ञांनी 45 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. अल्पावधीत या कंपनीचे शेअर्स 55-60 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 405 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअर्सची किंमत 8 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. मागील पाच वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 678 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.72 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.96 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 57,738.55 कोटी रुपये आहे.

चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 160 टक्क्यांच्या वाढीसह 203.04 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 78.28 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 1,569.71 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 1,464.15 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 01 March 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x