19 May 2024 12:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला
x

Vodafone Idea Share Price | 14 रुपयाचा व्होडाफोन आयडिया शेअर सुसाट तेजीत, कंपनीकडून सकारात्मक अपडेट आली

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या कर्जबाजारी दूरसंचार कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच कंपनीला अँकर गुंतवणूकदारांनी 1 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 8,200 कोटी रुपये गुंतवणुकीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

व्होडाफोन आयडिया कंपनी सध्या इक्विटी शेअर्स आणि कर्जाच्या माध्यमातून 45000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत अँकर गुंतवणूकदारांनी दिलेले आश्वासन कंपनीसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 14.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 6.59 टक्के वाढीसह 14.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्होडाफोन आयडिया कंपनीने टप्प्याटप्प्याने भांडवल उभारणीसाठी काही दिग्गज बँकर्स गटासोबत चर्चा सुरू केली आहेत. व्होडाफोन आयडिया कंपनी भांडवल उभारणीसाठी विविध स्त्रोतांचा वापर करत आहे. यामध्ये कंपनी प्रेफरन्स आधारावर गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारणीचा पर्याय देखील शोधत आहे. यासह व्होडाफोन आयडिया कंपनी फॉलो ऑन पब्लिक ऑफर इश्यू करण्याचा पर्याय तपासत आहे. प्रेफरन्स आधारावर कंपनी वॉरंट, राइट्स इश्यू किंवा FPO सारख्या हायब्रीड माध्यमातून भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करू शकते.

मागील काही आठवड्यात व्होडाफोन आयडिया कंपनीने अनेक परकीय गुंतवणूक संस्था, बँकर्स आणि दिग्गज गुंतवणुकदारांसोबत भांडवल उभारणीसाठी बोलणी सुरू केली आहे. अनेक प्रमुख अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीला इक्विटी गुंतवणूक करण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने गुंतवणूकदारांना माहिती दिली की, इक्विटी गुंतवणूक पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त कर्ज उभारणीसाठी कंपनीला देशांतर्गत कर्जदारांकडून देखील गुंतवणूकीचे आश्वासन मिळाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 02 March 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x