19 May 2024 12:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

NBCC Share Price | अल्पावधीत 260 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, नेमकं कारण काय?

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मागील अनेक दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स सातत्याने वाढत आहे. आज मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 132.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. ( एनबीसीसी इंडिया कंपनी अंश )

28 फेब्रुवारी 2024 रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीच्या पूर्ण मालकीची उपकंपनी HSCC (इंडिया) लिमिटेडला कोल्हापुर जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 459.7 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. यासह IFCI लिमिटेड कंपनीने देखील 150 कोटी रुपये मूल्याच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करण्याचा कॉन्ट्रॅक्ट एनबीसीसी इंडिया कंपनीला दिला आहे.

या करारामध्ये IFCI कंपनीच्या संपूर्ण भारतातील मालमत्तांच्या दुरुस्ती किंवा नूतनीकरणाचे काम एनबीसीसी इंडिया कंपनीला देण्यात आले आहे. गुरूवार, 29 फेब्रुवारी रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीने नवी दिल्लीस्थित 273 कोटी रुपये मूल्याच्या 61,000 चौरस फूट क्षेत्रफळाच्या व्यावसायिक बिल्ट-अप क्षेत्राचा ई-लिलाव यशस्वीरित्या पार पाडला आहे.

एनबीसीसी इंडिया लिमिटेड ही कंपनी भारत सरकारच्या मालकीची गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय अंतर्गत व्यवसाय करणारी नवरत्न कंपनी आहे. ही कंपनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, इंजिनिअरिंग प्रोक्योरमेंट आणि कन्स्ट्रक्शन तसेच रिअल इस्टेट या तीन क्षेत्रात व्यवसाय करतें. मागील एका वर्षात एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 260 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 55,000 कोटी रुपये आहे. LIC कंपनीने देखील एनबीसीसी इंडियाचे 6.55 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NBCC Share Price NSE Live 05 March 2024.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x