 
						KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंपर तेजीसह वाढत होते. आज देखील या कंपनीच्या स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. नुकताच या कंपनीला 4 मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 1706.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 2.31 टक्के वाढीसह 1,735.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी अंश )
फेब्रुवारी 2024 मध्ये केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1,895.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 259.16 रुपये होती. नुकताच केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीला चार नवीन सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्याची ऑर्डर मिळाली आहे. या प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता 9.40 मेगावॅट आहे. यामध्ये केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी प्रत्यक्षपणे 5 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पावर काम करणार आहे. तर उर्वरित 4.40 मेगावॅट क्षमतेचे काम आपल्या उपकंपनीद्वारे करणार आहे.
केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीला हे काम सस्टेनेबल स्पिनिंग अँड कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड, शार्विल टेक्स फॅब, धर्मा फॅब आणि रघुवीर टेक्सटाइल या कंपन्यांनी दिले आहे. हे प्रकल्प 2024-25 या आर्थिक वर्षात पूर्ण करणे अपेक्षित आहे. नुकताच KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने गुजरात उर्जा विकास निगम लिमिटेड कंपनीसोबत 200MWAC ग्रिड-कनेक्ट केलेल्या सोलर फोटोव्होल्टेइक पॉवर प्रकल्पातील वीज खरेदी करण्याचा करार केला आहे. हा प्रकल्प गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या खवडा सोलर पार्कमध्ये विकसित केला जात आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		