13 December 2024 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

Radico Khaitan Share Price | दारू भिकेला लावते, पण दारू बनवणाऱ्या कंपनीचा 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 14100% परतावा

Radico Khaitan Share Price

Radico Khaitan Share Price | मद्य निर्मात्या रॅडिको खेतान कंपनीच्या शेअर्सने दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. एके काळी 7 रुपये किमतीवर ट्रेड करणाऱ्या या स्टॉकने 1000 रुपये किमतीचा टप्पा पार केला आहे. ज्या लोकांनी मागील 5 वर्षात या स्टॉक मध्ये पैसे लावले होते, ते लोक सध्या मालामाल झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Radico Khaitan Share Price | Radico Khaitan Stock Price | BSE 532497 | NSE RADICO)

स्टॉक मार्केटमध्ये शेअर्सवर बेटिंग लावणे आणि परतावा कमावणे हा पूर्ण हिशोबाचा खेळ आहे. तुम्ही जर योग्य स्टॉकमध्ये पैसे लावले तर तुम्ही अल्पावधीत श्रीमंत होऊ शकता. जर तुमचा अंदाज चुकला आणि शेअर पडला तर तुम्हाला मोठ्या नुकसानालाही सामोरे जावे लागेल. म्हणूनच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी स्टॉकची संपूर्ण माहिती करून घ्यावी आणि पैसे लावावे. रॅडिको खेतान हा असाच एक मल्टीबॅगर स्टॉक आहे जो, शेअर बाजारात चर्चेचा विषय बनला आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मल्टीबॅगर परतावा कमवून दिला आहे.

स्टॉकची कामगिरी :
मागील 20 वर्षात रॅडिको खेतान कंपनीच्या शेअरची किंमत 7.62 रुपयेवरून वाढून 1087 रुपयेवर गेली आहे. या मद्य बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळात 14,100 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात रॅडिको खेतान कंपनीच्या शेअरची 1,000 रुपयांवरून 1,087 रुपयांवर गेली आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक मागील सहा महिन्यांत 790 रुपयांवरून 1,087 रुपयांवर गेला आहे. मागील सहा महिन्यांत या शेअरने आपल्या शेअर धारकांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारावर या शेअरची किंमत घसरली असून तो 11 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. आज (०२ जानेवारी २०२३) हा शेअर 1.27% वाढीसह 1,025 रुपयावर ट्रेड करत होता.

गुंतवणुकीवर परतावा :
रॅडिको खेतान कंपनीच्या शेअर्सने मागील 5 वर्षात आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या शेअरची किंमत 270 रुपयांवरून 1,087 रुपये किमतीवर पोहचली आहे. 5 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी 300 टक्क्यांहून अधिक परतावा कमावला आहे. रॅडिको खेतान कंपनीच्या शेअरची किंमत मागील 10 वर्षांत 145 रुपयांवरून वाढून 1,087 रुपयेवर पोहचली आहे. या काळात लोकांनी शेअरच्या माध्यमातून 650 टक्के परतावा कमावला आहे. जर तुम्ही एक महिनाभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर तुम्हाला आता 1.08 लाख रुपये मिळाले असते. ज्या गुंतवणूकदारानी सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.37 लाख झाले आहे.

त्याचप्रमाणे जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावून शेअर्स खरेदी केले असते, आणि ये शेअर्स होल्ड केले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 4 लाख रुपये झाले असते. ही मद्य बनवणारी कंपनी असून गुंतवणुकदार यातून भरघोस कमाई करतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Radico Khaitan Share Price 532497 in focus on return check details on 02 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x