9 May 2024 8:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Bonus Shares | सुवर्ण संधी! फ्री शेअर्स मिळवा, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, वेळीच फायदा घ्या

Bonus Shares

Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया कंपनी अंश )

अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया कंपनीचे शेअर्स 8.23 टक्के वाढीसह 171 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया कंपनीने बोनस इश्यूची पात्रता निश्चित करण्यासाठी 20 मार्च 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड ही कंपनी गुंतवणुकदारांना नियमित लाभांश देखील वाटप करत असते. 9 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीने गुंतवणुकदारांना 2 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप केला होता. कंपनीने पहिल्यांदा 2008 मध्ये गुंतवणूकदारांना लाभांश वाटप केला होता.

मागील आठवड्यात गुरुवारी अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया कंपनीचे शेअर्स 157.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 112 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 73 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिनाभरात या कंपनीचे किंचित घसरले होते. मात्र आज हा स्टॉक 8 टक्के वाढीस ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 174.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 66.75 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 730.03 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Advani Hotels Share Price 11 March 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x