
Tata Technologies Share Price | नुकताच टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने तेलंगणा सरकारसोबत करार केल्याची माहिती दिली आहे. तेलंगणा राज्यातील 65 औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI चे कौशल्य विकास केंद्रांमध्ये रूपांतर करण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, ITI चे कौशल्य विकास केंद्रांमध्ये रुपांतर केल्यानंतर राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात कुशल कामगार उपलब्ध होतील. आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 3.61 टक्के घसरणीसह 1,086.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने तेलंगणा राज्य सरकारसोबत 5 वर्षांचा एक सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत राज्यातील 65 शासकीय आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याचे काम टाटा टेक्नॉलॉजी कंपनी करणार आहे. यासाठी 2324 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. या करारानुसार आयटीआय श्रेणीमध्ये सुधारणा झाल्यानंतर ते कौशल्य विकास केंद्र म्हणून काम करतील.
ITI संस्था अपग्रेड करण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने 20 जागतिक उद्योग भागीदारांसोबत करार केल्याची माहिती दिली आहे. ही संस्था विद्यार्थ्यांना 8 दीर्घकालीन आणि 23 शॉर्टटर्म कोर्स ऑफर करेल. यामुळे ITI संस्थानाच्या अपग्रेडिंगसह कुशल कामगारांची देखील उपलब्धता वाढणार होणार आहे. दीर्घकालीन अभ्यासक्रमांद्वारे दर वर्षी 9000 विद्यार्थ्यांना आणि अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांद्वारे दर वर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मागील वर्षी 30 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते. या कंपनीच्या शेअर्सची IPO इश्यू किंमत 500 रुपये होती. आणि स्टॉक 1200 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. सूचीबद्ध झाल्यापासून या स्टॉकने 1348 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.