27 April 2024 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार
x

Adani Port Share Price | मल्टिबॅगर अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, मजबूत टार्गेट प्राईस जाहीर

Adani Port Share Price

Adani Port Share Price | 2023 मध्ये हिंडेनबर्ग अहवालात जे आरोप करण्यात आले होते, त्यामुळे अदानी समुहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स क्रॅश झाले होते. मात्र आता या समुहाच्या कंपन्या विक्रीच्या गर्तेतून बाहेर येत आहेत. यापैकी अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. ( अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनी अंश )

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन ही कंपनी स्टार परफॉर्मर ठरली आहे. या कंपनीने मागील 16 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 20 वेळा लाभांश वाटप केला आहे. आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 0.86 टक्के वाढीसह 1,336.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अनेक ब्रोकरेज हाऊसेसने अदानी पोर्ट्स स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकवर तज्ञांनी 1,500 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स 1,329.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2024 या वर्षात अदानी पोर्ट्स स्टॉक तब्बल 27 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 91 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 263 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2008 या वर्षी जगात आर्थिक मंदी आली होती. त्यावेळी सर्व कंपन्याच्या शेअर्सने बॉटम स्पर्श केला होता. 2008 मधील या मंदीपासून आतपर्यंत अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 982.75 टक्के परतावा कमावून दिला आहे. 7 मार्च 2008 रोजी या कंपनीचे शेअर्स 122.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 7 मार्च 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 1,327.45 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,86,747.64 कोटी रुपये आहे. अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,356.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 571.35 रुपये होती.

चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत अदानी पोर्ट्स कंपनीमध्ये FII/FPI ने आपला हिस्सा 13.83 टक्केवरून 14.72 टक्के वाढवला आहे. नुकताच अदानी पोर्ट्स कंपनीने फेब्रुवारी 2024 या महिन्यात एकूण 35.4 एमएमटी कार्गो हाताळले, ज्यात वार्षिक 33 टक्के वाढ झाली आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत अदानी पोर्ट्स कंपनीने वार्षिक महसूल संकलनात 45 टक्के वाढ नोंदवली आहे. आणि 6,920 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीचा PAT वार्षिक आधारे 65 टक्के वाढीसह 2,208 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर EBITDA 59 टक्के वाढीसह 4,293 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

सप्टेंबर 2008 पासून अदानी पोर्ट्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 20 वेळा लाभांश वाटप केले आहे. मागील 12 महिन्यात या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना एकूण 5 रुपये लाभांश वाटप केला होता. अदानी पोर्ट्स कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण 0.38 टक्के आहे. अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स फक्त एकदाच विभाजित झाले होते. 23 सप्टेंबर 2010 रोजी, कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 5 भागात विभाजित केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Port Share Price NSE Live 11 March 2024.

हॅशटॅग्स

Adani Port Share Price(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x