 
						Nykaa Share Price | मागील काही दिवसांपासून नायका कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन रिटेलर नायका कंपनीचे शेअर्स आज विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशन फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 190 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( नायका कंपनी अंश )
नायका कंपनीच्या IPO ची नेत्रदीपक लिस्टिंग झाल्यानंतर स्टॉकमधे जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. आज मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी नायका स्टॉक 2.22 टक्के घसरणीसह 156.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुवामा फर्मच्या तज्ञांच्या मते, नायका कंपनीचे शेअर्स 189 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्या तज्ञांनी या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. सध्या नायका स्टॉक 156 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 10 जानेवारी 2024 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 195.40 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
नायका कंपनीचा IPO 2021 साली शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO मध्ये शेअर्सची इश्यू किंमत 1125 रुपये निश्चित करण्यात आली होती. लिस्टिंगमध्ये हा स्टॉक 2000 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. त्यानंतर या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 5:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. यात कंपनीने 1 शेअर्सवर 5 बोनस मोफत दिले होते. यामुळेच शेअर 200 रुपये किमतीवर आले होते.
बॉलीवूडमधील अभिनेत्री आलिया भट्टने जुलै 2020 मध्ये फाल्गुनी नायर यांच्या नेतृत्वाखालील नायका कंपनीमध्ये 4.95 कोटी रुपये मूल्याची गुंतवणूक केली होती. तर कतरिना कैफने देखील 2018 मध्ये नायका कंपनीत 2.04 कोटी रुपये गुंतवणूक करून नायका-KK Beauty या संयुक्त उपक्रमाची स्थापना केली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		