11 May 2024 11:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! अल्पावधीत पैसा वाढवा, या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सचा फायदा घ्या

Bonus Shares

Bonus Shares | केसर इंडिया या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 3342.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 112 रुपयेवरून वाढून 3300 रुपये किमतीवर पोहचले आहे. ( केसर इंडिया कंपनी अंश )

मागील एका वर्षात केसर इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2800 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच केसर इंडिया कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 6:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी केसर इंडिया स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 3,342.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

रेकॉर्ड तारीखच्या दिवशी केसर इंडिया कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर 6 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. या कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 19 मार्च 2024 हा दिवस निश्चित केला आहे.

केसर इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4319.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 112 रुपये होती. 2024 या वर्षात केसर इंडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 227 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1024.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 3342.75 रुपये किमतीवर पोहचला आहे.

मागील 6 महिन्यांत केसर इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1207 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 255.60 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. तर 15 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3342.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी केसर इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 13.07 लाख रुपये झाले असते. मागील एका महिन्यात केसर इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Kesar India Share Price BSE Live 16 March 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x